*धुळे - विधानसभा निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. या विजयात शिवसेना सोडून ऐनवेळी भाजपत दाखल झालेले डॉ.सुशील महाजन देवपुरातल्या नियोजनात ‘किंगमेकर’ ठरले आहेत. त्यांनी देवपुरातील सुत्र हातात येताच आपल्या परिने अचुक नियोजन केले आणि ते यशस्वीही झाल्याचे सांगण्यात येत आहे. ते स्वतः आमदारकीसाठी इच्छूक होते. त्यामुळे त्यांनी तशी तयारीही करुन ठेवली होती. त्यांनी स्वतःसाठीची सर्व ताकद ऐनवेळी अनुप अग्रवाल यांच्यासाठी वापरली. विशेष म्हणजे अनुप अग्रवाल आमदार होताच डॉ.सुशिल महाजन यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईला बोलावून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची मा.मंत्री डॉ.सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल,जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष ओळख करुन दिली. धुळे शहरातील देवपुरात मिळालेल्या मताधिक्यांत डॉ.सुशिल महाजन यांचा मोलाचा वाटा आहे. असे आवर्जुन सांगितले हे विशेष!
*तरुणाई रस्त्यावर*
अनुप अग्रवाल यांच्या विजयात अनेक घटकांचा वाटा आहे. शहराच्या सर्वच भागातून त्यांच्यावर मतांचा अक्षरशः वर्षाव झाला. यंदा प्रथमच देवपुरतुन धर्मयोद्धा म्हणून निवडणूक लढलेले अनुप अग्रवाल यांच्यासाठी मतांचा पुर आल्याचे त्यांना शुभेच्छा देणार्या जनतेच्या गर्दीतून दिसुन आले. त्यांच्या देवपुरात तासंन तास प्रतिक्षा करत महिला आरत्यांचे आरतीचे ताट घेवून उभ्या होत्या. न भूतो ना भविष्यती अशी रेकॉडब्रेक गर्दी आणि उर्त्स्फुर्तपणे तरुणाई रस्त्यावर होती.
*डॉ.सुशिल महाजनांचा सन्मान*
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारणांच्या सुत्रानुसार गेल्या दहा-पंधरा पेक्षा जास्त वर्षापासून डॉ.सुशिल महाजन शिवसेनेत कार्यरत होते. धुळे शहरातील प्रसिध्द मेंदू विकार तज्ञ म्हणून जनतेची सेवा करतांना त्यांनी सामाजिक कामात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची वेल एज्युकेटेड अशी वेगळी प्रतिमा आहे. त्या प्रतिमेचा भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणूकीत फायदा झाला. तसा रिझल्टही डॉ.महाजन यांनी दिला. पक्षानेही प्रवेश करताबरोबर त्यांचा सन्मान करीत प्रदेश सरचिटनिसपदी नियुक्ती केली. भविष्यातही डॉ.महाजन यांचा पक्षाला फायदाच होईल असे सध्यातरी म्हणायला हरकत नाही.
*संयम,मनाचा मोठेपणा*
मागील विधानसभा निवडणुकीत ते धुळे विधानसभा लढविण्यासाठी उच्छुक होते. त्या दृष्टीने त्यांची तयारी देखील झाली होती. परंतु ऐनवेळी पक्षनेतृत्वाने त्यांना थांबविले. त्यांनीही तेव्हाचे उमेदवार हिलाला माळी यांच्यासाठी संयम,मनाचा मोठेपणा दाखवत पक्षाचा आदेश मानला. निष्ठावंत शिवसैनिकांनी काम सुरुच ठेवले. दरम्यानच्या काळात शिवसेनेत फुट पडल्यानंतर देखील पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत डॉ.महाजन शिवसेना उबाठातच राहिले. महानगरप्रमुख या पदावर काम करतांना त्यांनी पक्षासाठी तन, मन, धनाने काम केले. शिवजंती, सामाजिक उपक्रम, सांस्कृती कार्यक्रम स्वखर्चाने केले. पक्षाला वेळोवेळी बळ देण्याचे काम डॉ.महाजन यांनी केले. यावेळी मात्र देवपुरातील जनता डॉ.सुशिल महाजन यांच्या पाठीशी उभी राहीली. डॉ.सुशिल महाजन यांच्या शब्दाला किंमत देत हिंदुत्वासाठी विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांच्यासाठी भरभरुन मतांचे दान केले, असे लोक बोलतांना दिसत आहेत. देवपुरातून किंगमेकर ठरलेल्या डॉ.सुशिल महाजन यांची भविष्यातली रणनिती कशी असेल हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
0 Comments