Header Ads Widget

*बेधडक... रोखठोक... जनसामान्यांच्या प्रश्न *विरोधी पक्षाने स्वतःच्या पायावर* *दगड मारून घेतला!*



सत्ता मिळविणे प्रत्येक राजकीय पक्षाचे ध्येय असते. ते साध्य करण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत असतात. कोणत्याही मार्गाने सत्ता हस्तगत करण्यासाठी रात्रंदिवस झटत असतात. पण हे ध्येय साध्य करण्यासाठी काही मर्यादा पण असतात. याचा अर्थ असा नव्हे की देशाशी प्रतारणा करून देश 
हिताला तिलांजली द्यायची! राजकारण करतांना आधी  देश व समाज हित लक्षात घेणे आवश्यक आहे. देशाची सुरक्षितता धोक्यात आणून
जर सत्ता हस्तगत करत असाल
तर त्याचा जनतेवर नकारात्मक
परिणाम होतो. जनता आता अभ्यासु असुन यांचे बारीक निरीक्षण करते. अवलोकन करते. समाजात त्याची चर्चा होते. विचार विनिमय
होतो. देशाची आजची परिस्थिती काय आहे याचा अभ्यास प्रत्येक
राजकीय पक्षाने करणे गरजेचे आहे .विरोधी पक्षातील सर्वात मोठी चूक केली असेल ती मुस्लिम संघटनेच्या काही अटी स्वीकारल्या. या अटींचा अभ्यास केला तर यात काही देश विरोधी
सुद्धा मागण्या आहेत. काही देशद्रोही अटी सुद्धा आहेत. जेव्हा माध्यमातून ह्या अटी वाचण्यात आल्या तेव्हा सामान्य
माणूस चक्रावून गेला.त्याला जबरदस्त धक्का बसला. यावर 
विचार करू लागला की इतक्या
भयानक मागण्या मंजूर केल्या कशा? यात देशाचे किती नुकसान होणार आहे!काँग्रेस पक्ष देश स्वतंत्र झाल्यापासून एका विशिष्ट धर्मियांचे तुष्टीकरण सत्ता मिळविण्यासाठी करीत आहे. त्यांच्या फायद्यासाठी अनेक शासनाच्या योजना अंमलात आणल्या. जर महा विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर मुस्लिम समाजाचे जे दंगलखोर
जेल मध्ये आहेत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावे, तसेच
लोकसभेमध्ये दुरुस्तीसाठी आणलेल्या वक्फ बोर्ड कायद्याला विरोध करणे, मुस्लिम
धर्म गुरूंना पगार चालू करणे ,फक्त मुस्लिम समाजाच्या 
तरुणांना पोलीस भरतीत प्राधान्य 
देणे अशा एकूण सतरा मागण्या
मंजूर करून महा विकास आघाडी सत्तेसाठी किती उतावीळ होती हे यावरून सिद्ध होत आहे. अशा मागण्या मंजूर करून मुस्लिम समाजाच्या हातात राज्याची सत्ता सुपूर्द केल्या सारखे होते.पण राज्याच्या
सुदैवाने या आघाडीचा दणदणीत
पराभव झाला व गुलाम गिरी चे
पर्व आले नाही.काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट व यांच्या नेत्यांच्या वक्तव्याचा 
अभ्यास केला तर यांनी काही 
राष्ट्रीय धोरणांना विरोध केला आहे. ३७० कलम पुन्हा जम्मू,
काश्मीर राज्याला लागू करू
असे देशाला आश्वासन दिले आहे.कश्मिर मधील अतिरेक्यांना 
ठार न करता त्यांना पकडावे.
तसेच जे देशद्रोही कृत्य करतात
त्यांच्या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे अशी अनेक कारणे आहेत
त्यामुळे या विरोधी पक्षाविषयी
जनतेत असलेली सहान भुती 
कमी झाली. त्याचा मतदानावर
नकारात्मक परिणाम झाला.छत्रपती श्री. शिवराय महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. महा विकास आघाडीच्या निवडणूक मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज व जय शिवराय, 
हर हर महादेव यांच्या घोषणा 
ऐकावयास मिळाल्या नाहीत.
भगवे झेंडे फडकताना दिसले नाहीत.मात्र हिरवे झेंडे मोठ्या
दिमाखात फडकताना दिसत होते. अनेक नेते राष्ट्रीय धार्मिक
कार्यक्रमास विरोध करतात.देशातील अनेक धार्मिक कार्यक्रमावर काही मुस्लिम नागरिक नेहमीं दगडफेक करतात. हल्ले करतात. पण हे
विरोधी पक्ष हे त्याचा साधा निषेध सुद्धा
व्यक्त करताना दिसत नाहीत. त्यांना समजावून सांगत नाही .
या सर्व परिस्थितीचा विचार करून जनतेने मत पेटी द्वारे
आपला निषेध व्यक्त केला आहे.
म्हणून महा विकास आघाडीला 
मोठे नुकसान सोसावे लागले.मराठा समाज आरक्षण साठी प्रयत्न केला नाही, त्यास विरोध 
केला म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी 
पक्ष विरुद्ध नाराज आहे. मुस्लिम
समाजासाठी आरक्षणाची मागणी करतात पण मराठा समाज आरक्षण साठी प्रयत्न करीत नाही याचा राग आहे .मराठा समाजाची राज्यात मोठी संख्या आहे. त्याचा मतदानावर परिणाम होऊन महाविकास आघाडीला मोठा फटका बसला.
महा विकास आघाडी ची इतकी
वाईट अवस्था झाली आहे की
त्यांना विरोधी पक्ष पद मिळणार
नाही. कारण त्यांचे उमेदवार
अत्यंत कमी निवडून आले आहे.
राज्यसभेत खासदार म्हणून
 विरोधी पक्षाचे नेते जाण्याची शक्यता कमी आहे. कारण आमदार म्हणून त्यांचे संख्याबळ
खूप कमी आहे.राजकीय पक्ष कोणताही असो प्रथम देश व समाज हित लक्षात घेणे आवश्यक आहे. केवळ सत्ता
प्राप्तीसाठी देशाशी बेईमान गिरी
कोणी करत असेल तर जनता
त्यांना निवडणूक मध्ये त्यांना त्यांची योग्य जागा दाखवीत असते हे या वेळी सिद्ध झाले.
लोकशाहीचा दुरुपयोग करणाऱ्यांना हा मोठा धडा मिळाला आहे. देश, जनता यांच्याशी एकनिष्ठ राहणार 
नसेल तर जनता सुद्धा अशा
स्वार्थी व सत्ता लंपट नेत्यांना
उचलून बाजूला फेकते हे या
निवडणुकीत दिसून आले
. *हेमंत जगदाळे खान्देश सम्राट धुळे*

Post a Comment

0 Comments