Header Ads Widget

*पराभवाने खचू नका, मी कायम पाठीशी* *कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कामराज निकम यांचे प्रतिपादन*




मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे.

दोंडाईचा,  शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तन मन धनाने काम केले. पण ईव्हीएम मशीनने आपला पराभव केला. संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीचा पराभव ईव्हीएमने झाला असुन याबाबतचे मंथन महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे शिंदखेडा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख कामराज निकम यांनी केले. काल येथील काकाजी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या आभार सभेत ते बोलत होते. यावेळी श्री. निकम म्हणाले की, कार्यकर्त्यांनी खचुन जाऊ नये. नेतेमंडळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. येणारा काळ आपला राहील, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी महाविकास आघाडीचे
पराभुत उमेदवार संदीप बेडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मी कायमस्वरुपी शिंदखेडा येथे राहणार असुन मतदारसंघात आपल्या संपर्कात राहून आपल्या पाठीशी पुर्ण ताकदीने उभा राहणार आहे. यावेळी उबठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, डॉ. नितीन चौधरी, प्रमोद सिसोदे, ज्ञानेश्वर भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. कैलास ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर जि.प सदस्य ललित वारुडे, प्रा. सुरेश देसले, सर्जेराव पाटील, भडणे गावाचे सरपंच गिरीश देसले, अरुण सोनवणे, नंदु चव्हाण, दिपक देसले, दिपक अहिरे, महेंद्र निकम, अरुण देसले आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments