Header Ads Widget

मित्रवर्य महेंद्र पाटील यांच्या निवृत्ती निमित्त दोन शब्द...🌹🌹




   दोंडाईचा --- आदरणीय नानासाहेब डॉ. हेमंतराव देशमुख व डॉ बापूसाहेब रवींद्र देशमुख यांच्या शैक्षणिक संस्थेमधून आमचे परमप्रिय मित्रवर्य महेंद्र पाटील यांचा आज निवृत्तीचा कार्यक्रम होत आहे. त्यानिमित्त शब्दाची पुष्पांजली वाहत आहे .
     १९८४ च्या बॅचमधील महाविद्यालयीन जीवनात मित्र महेंद्र पाटील यांचा सहवास लाभला. कॉलेज जीवन पूर्ण झाल्यानंतर डॉ. नानासाहेब यांच्याकडे "हनुमाना" प्रमाणे "दास भक्ती "..करणारा हा मित्र, डॉ नानासाहेबांचा पर्सनल सेक्रेटरी होता .
    पुढे महेंद्र हा ज्ञानदानात शैक्षणिक संस्थेत कार्यरत झाला, हा मित्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लहानाचा मोठा झाला. दोंडाईचा शहरांमधील त्यांचं प्राथमिक, माध्यमिक ,महाविद्यालयीन शिक्षण घेत हे मित्र स्वकर्तुत्वाने विद्यालयात ज्ञानदान क्षेत्रात पदार्पण करतात. त्या त्यांची निपुणता समर्पित करतात . यश संपादन होते, हे खरोखर  वाखाण्याजोग आहे.
    आमचा मुलगा काय शिकला..? याचं काही ज्ञान आई-वडिलांना नसतं, परंतु शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत प्रगती करणे हे खरंतर मित्र महेंद्र यांचीही गरुड झेप कुटुंबाकरिता, नातेवाईक, गावाकरिता मित्रांकरिता अभिमानास्पद आहे.
   ज्या शाळेत ज्या गावात शिकले त्याच शैक्षणिक संस्थे मधील संस्थापक डॉ नानासाहेबांनी महेंद्र पाटील यांना ज्ञानदाना ची संधी दिली हे फार मोठ मौलिक काम डॉ नानासाहेबांच्या हातून झालं.
    या शैक्षणिक संस्थेत आमचे दुसरे परमप्रिय मित्र प्रकाश जी हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत, तर महेंद्र पाटील हे त्याच संस्थेमध्ये एका विभागाचे प्रमुख आहेत .हा मित्रांचा संगम हा "दुग्ध शर्करा" योगच आहे .   
     महेंद्र पाटील या मित्राने त्यांच्या कुटुंबात यश संपादन करत असताना त्यांना दोन सोन्यासारखी मुलं व संपूर्ण आयुष्य पडद्यामागे राहून साथ देणारी सौभाग्यवती सौ पाटील ताईसाहेब ..असं "छान कुटुंब "..लाभलं. त्यांनी स्वकर्तृत्वातून स्वतःची दोंडाईचे शहरात "वास्तू "ही उभी केली,हे खरोखर अभिमानास्पद आहे.
    मित्र आज तुम्ही निवृत्त होत आहेत, तुमच्या उर्वरित आयुष्य करिता भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य देवो.अशी प्रार्थना करतो. 🌹🌹
   आपला स्नेही मित्र
    ॲड प्रमोद पाटील 
             पुणे

Post a Comment

0 Comments