Header Ads Widget

बेटावद व नरडाणा परीसरात डुबलीकेट पन्नास रुपयाची नोट बाजारात दाखल







बेटावद प्रतिनिधि 

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे आज पन्नास रुपयाची नकली नोट आढळून आल्याने नरडाणा व बेटावद येथे गोरगरिबामध्ये नाराजी च्या सुर ऐकण्यास मिळत आहे . 
याच्या आधीही नकली नोटांच्या संदर्भातील अनेक घटना समोर आल्या आहेत. नकली नोट छापणाऱ्या टोळ्यांनी खऱ्या चलनी नोटांच्या हुबेहूब नकली नोटा छापून त्या मार्केटमध्ये वितरीत करत असतात यामुळे सामान्यांना खरी चलनी नोट आणि हुबेहूब नकली नोट याच्यातील फरकच कळत नाही याचा गैरफायदा नकली नोटा बनविणाऱ्या टोळ्या घेतात आणि सामान्यांच्या हातात त्या ठेवून जातात.

अनेकदा अजाणतेपणाने आपणही या बनावट नोटांमध्ये व्यवहार करत असतो कारण एकतर आपण वेळे अभावी नोट निरखून बघत नाही आणि अनेकदा बनावट नोट ओळखायची कशी हे आपल्याला माहीत नसतं

रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर बनावट नोट म्हणजे काय इथपासून ते ती कशी ओळखायची याविषयीची सर्व माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे.

Post a Comment

0 Comments