लोकशाहीमधे विरोधी पक्ष नेता व विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने पहारेकरी म्हणून भुमिका पार पाडत असतो. हा पहारेकरी ज्या प्रमाणात सजग असेल त्या प्रमाणात लोकशाही सजग व सदृढ बनते विरोधी पक्ष नेता हा सरकारच्या चुकीच्या धोरणावर टिका करणे समाजात निर्माण होणाऱ्या अराजकतेविरुद्ध भुमिका घेतो दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याविषयीची चौकशी करण्याचा आग्रह धरतो समाजतल्या अनेक समूहांच्या प्रश्नांना वाचा फोडतो, शेतकरी कष्टकरी आदींच्या प्रश्नांवर विधीमंडळात आवाज उठवतो विरोधीपक्ष नेत्याला खूप अधिकार असतात एखाद्या मंत्र्या प्रमाणे अधिकार असतात जर सभागृहात तो नसेल तर विरोधकांची कार्यक्षमता कमी होते अनेक कायदे करतानां विविध समित्या असतात त्यामध्ये विरोधीपक्ष नेता हा महत्त्वाचा दुवा असतो.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवले तर विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला मिळून फक्त 50 जागा जिंकता आल्या महाविकास आघाडीमध्ये एकाही पक्षाकडे विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्यासाठी लागणारे संख्याबळ नाही. याआधी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत देखील कांग्रेसला कमी जागा मिळाल्याने लोकसभेत विरोधी पक्ष नेताच नव्हता तिच परिस्थिती आता महाराष्ट्राची झाली आहे.कारण महाराष्ट्रात विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्यासाठी 288 पैकी 29 जागा लागतात ज्या कोणत्याच पक्षाकडे नाही विरोधीपक्ष नेता हा लोकशाहीचा आत्मा असतो त्यामुळे 10% जागा नसल्या तरी विरोधीपक्ष नेतेपद देणे हे विधानसभा आणि अध्यक्ष यांच्या हातात असते .
1986 मधे शरद पवार यांनी समाजवादी कांग्रेस पक्षाचे कांग्रेसमध्ये विलीनीकरण केले होते शरद पवार हे तेव्हा विरोधी पक्षनेते होते विलीनीकरणानंतर पवारांना विरोधी पक्षनेतेपद सोडावे लागले होते तेव्हा विरोधातील जनता पक्षाचे 20 तर शेकापचे 13 आमदार होते कोणत्याच पक्षाकडे अपेक्षित संख्याबळ नव्हते पण तात्कालीन कांग्रेस सरकारने जनता पक्ष आणि शेकापकडे विरोधी पक्षनेतेपद सोपविले होते त्यावेळी कांग्रेस सरकारने विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपद सोपविण्याचे मनाचे मोठेपणाचे औदार्य दाखविले होते दिल्लीतही आप सरकारने भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसतानां विरोधी पक्षनेतेपद दिले होते राज्यातील महायुतीचे सरकार पुरेसे संख्याबळ नसतानां किंवा महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ मान्य करणार का ? तस जर केले तर मोठ मन दाखवल्या सारखे होईल.
*आण्णा कोळी महादेवपुरा दोडाईंचा*
0 Comments