धुळे - धुळे जिल्ह्यातील पाचही मतदार संघात उद्या शनिवार दि. २३ रोजी मतमोजणीसह निकाल जाहीर होणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण केली असून मतमोजणी केंद्रावर चोख असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था मतदान केंद्रावर ठेवण्यात येणार असून ज्यांना पास देण्यात आले आहेत त्यांनाच मतमोजणी केंद्रावर प्रवेश दिला जाईल. कोणीही मतमोजणी ठिकाणी मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू, साहित्य तसेच इतर आक्षेपार्ह सामान घेवून येण्यास बंदी आहे. तसेच विजयी उमेदवारांनी किंवा समर्थकांनी मिरवणूक काढण्यावरही बंदी असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यातील पाच मतदार संघाच्या मतमोजणीसाठी आवश्यकत तयारी पूर्ण करण्यात आली आहे. धुळे शहरात तसेच मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पोलीसांचा कडक बंदोबस्त असेल. नगावबारी परिसरातील केंद्रीय विद्यालयातील मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात सीसीटीव्ही सह पॅरामिलट्री ङ्गोर्सचे जवान तैनात असतील दुसर्या टप्प्यात एसआरपीएङ्गचे जवान तैनात राहतील आणि तिसर्या टप्प्यात स्थानिक पोलीस कर्मचारी नियुक्त कण्यात आले आहेत. ज्यांना मतमोजणीच्या केंद्रावर प्रवेशाची परवानगी मिळाली आहे, पास देण्यात आले आहेत. त्यांची कसून तपासणी करूनच आत सोडण्यात येईल, कुणालाही मोबाईल नेण्यास परवानगी नसेल तसेच शहरात शांतता टिकून रहावी यासाठभ सर्व उमदेवारांच्या निवासस्थानाजवळ देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निवडून येणार्या उमदेवाराने अथवा समर्थकांना मिरवणूक काढण्यास परवानगी नाही. कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बाधीत होईल अशा प्रकारच्या घोषणा देणे, भावना दुखावती असे कृत्य करणे, मिरवणूक काढणे असे प्रकार केल्यास अतिशय कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी म्हटले आहे.
0 Comments