Header Ads Widget

*आण्णासाहेब एन. डी. मराठे शैक्षणिक संकुलनात संविधान दिन साजरा.*



शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - शहरातील आण्णासाहेब एन.डी.मराठे शैक्षणिक संकुलात दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी "संविधान दिन" उत्साहात साजरा करण्यात आला..!
  संविधान दिनाच्या निमित्ताने "वक्तृत्व स्पर्धेचे" आयोजन विद्यालयात करण्यात आले होते. त्यात  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व आपल्या वक्तृत्वातून विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान, भारतीय संविधान निर्मितीचा काळ, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतातील विविधतेमध्ये एकता जपणारा राष्ट्रीय ग्रंथ संविधान अशा विविध मुद्द्यांच्या आधारे संविधानाची माहिती दिली व संविधानाचे महत्त्व पटवून दिले.
   तसेच उपशिक्षक श्री. पी. बी. राजपूत व श्री.एच.डी. कापुरे यांनी भारतीय नागरिकांच्या जीवनातील भारतीय राज्यघटनेचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर शिक्षक व  सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले व संविधानाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

0 Comments