Header Ads Widget

शिंदखेडा पंचायत समितित धक्का दायक प्रकार अधिकाऱ्याने केली शरीरसुखाची मागणी, महिला ग्रामसेविकेने चोप देत तोंडाला काळं फासलं



शिदखेड्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदखेडात सरकारी अधिकाऱ्याने महिला ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर या महिलेने या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासून चोप दिल्याची घटना घडली आहे.

 शिंदखेडा येथे ही घटना घडली आहे. या महिलेने अधिकाऱ्याला चोप देतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला ग्रामसेविकेचा विनयभंग करून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ग्राम विस्तार अधिकाऱ्याला महिलेने चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या भागात ही घटना घडली आहे. या पीडित महिलेने संबंधित अधिकाऱ्याला फक्त चोपच दिला नाही तर संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे देखील फासले आहे. अधिकाऱ्याला चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं ?

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या ग्राम विस्तार अधिकारी एस के सावकारे या ग्राम विस्तार अधिकाऱ्यातर्फे गेल्या काही दिवसांपासून सदर महिला कर्मचारीकडे शारीरिक सुखाची मागणी करत होता. या अधिकाऱ्याकडून महिलेचा सातत्याने विनयभंग केला जात होता. या घटनेमुळे या प्रकाराची तक्रार सदर पीडित महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. परंतु तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नव्हती.

तक्रारीची दखल घेत नसल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर सदर महिला कर्मचारीने थेट कार्यालयातच जाऊन संबंधित ग्राम विस्तार अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिला. तसेच त्या अधिकाऱ्याला तोंडाला काळे फासून जाब देखील विचारला. त्यामध्ये सदर महिला कर्मचारीने ठाकरे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची देखील मदत घेतली. यावेळी महिलेसोबत ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हा पदाधिकारी शानभाऊ सोनवणे व गीरीशभाऊ देखील होते. तेही संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात गेल्याचे दिसून आले आहे.



Post a Comment

0 Comments