""""""""""""""""""""""""""""""""""""
साक्री:- साक्री येथील श्री शिव पुराण उत्सव समिती च्या वतीने, भागवतभूषण, आंतरराष्ट्रीय किर्तीचे कथा प्रवक्ता श्री पंडित प्रदीजी मिश्रा यांच्या , "श्री शिवपुराण कथा" श्रावणाचे आयोजन, शुक्रवार दि २४ जानेवारी २०२५ ते शनिवार दि. ३० जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
कथा स्थळांचे भूमी पूजन निमित्त सोमवार दिनांक
२५-११-२०२४ रोजी सकाळी ८ वाजता सुशिल नगरातील सोमेश्वर महादेव मंदिरापासून
कथा स्थान ,धुळे सुरत बायपास जवळील ,फौजी पेट्रोल पंपा पंर्यत शोभा यात्रेचे
आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी साडे दहा वाजता कथा स्थानी भूमी व सभा मंडप पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शोभा यात्रा,सभा मंडप पूजन आणि भूमी पूजनाच्या कार्यक्रमात श्रद्धावंतांनी सहभाग घेण्याचे
आवाहन साक्री तालुका श्री शिवपुराण ऊत्सव समितीचे अध्यक्ष शशिकांत श्रीवास्तव ऊर्फ बंटी भाऊ कायस्थ यांनी केले आहे.
0 Comments