पद्मालया फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड,शिवनी तालुका भडगाव जिल्हा जळगाव कंपनी चे एफ आय सी आय या दर्जाचे फुले रेवती,लॉट नंबर मार्च 24 - 13 - 065 - 147 रब्बी हंगामासाठी दादर पिकाचे बियाणे शिंदखेडा येथे आमीन भाई राज ऍग्रो यांच्या दुकानातून घेतले.परंतु ते बियाणे खराब निघाले आहे. यासंदर्भात कृषी खात्याने लवकरात लवकर चौकशी करून न्याय मिळवून द्यावा,अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन करण्यात येईल.
भूषण पवार माजी सैनिक शिंदखेडा
शिंदखेडा - येथील शेतकरी सेवानिवृत्त जवान भूषण पवार यांनी आपल्या वरपाडे शिवारातील एक हेक्टर 22 आर इतक्या क्षेत्रासाठी पद्मालय फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड शिवनी तालुका भडगाव जिल्हा जळगाव या कंपनीचे एफ आय सी आय या दर्जाचे फुले रेवती हे रब्बी हंगामातील (ज्वारी ) दादर पिकाचे वाण पेरणीसाठी घेतले होते.सदर बियाणे शिंदखेडा येथील राज ऍग्रो अँड कन्सलटन्ट स्टेशन रोड शिंदखेडा यांच्या दुकानातून दिनांक 9/11/2024 रोजी घेतले होते.या रब्बी हंगामाच्या ज्वारी(दादर) या वाणाची लागवड (पेरणी) दिनांक 9 नोव्हेंबर रोजी शिंदखेडा येथील भूषण अभिमन्यू पवार यांनी आपल्या शेतात केली होती.दिनांक 17 नोव्हेंबर रोजी शेतात जाऊन चौकशी केली असता सदर पिक उतरलेले नव्हते यासंदर्भात दिनांक 19 नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधिकारी,शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे सदर बियाण्याची तसेच क्षेत्राची चौकशी करून मिळावी अशी तक्रार केली,परंतु महाराष्ट्रात निवडणूक कालावधी असल्याने या तक्रारीवर कुठलीही दखल घेतली गेली नाही तरी सोमवारपासून प्रत्येक कार्यालयात अधिकारी येणार त्यानंतरच आपल्या तक्रार निवेदनावर कारवाई करण्यात येईल असे कृषी कार्यालयातून सांगण्यात आले.यामुळे सदर क्षेत्राची दुबार पेरणी होऊ शकली नाही म्हणून लवकरात लवकर सदर चौकशी होऊन पंचनामा करून योग्य ती भरपाई मिळावी अशी अपेक्षा यावेळी सदर शेतकऱ्याने व्यक्त केली आहे
0 Comments