Header Ads Widget

*शिंदखेडा मतदारसंघात जयकुमार रावल यांच्या विजयाची घोडदौड कायम* *संदिप बेडसे, श्याम सनेर यांचा पराभव*




शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार आमदार जयकुमार रावल पाचव्यांदा प्रंचड मतधिक्क्याने निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप बेडसे यांचा आमदार जयकुमार रावल यांनी 96 हजार 471 मतांनी आघाडी घेत पराभव केला. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार श्याम सनेर यांचे डिपॉझिट जप्त झाले .
निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली पहिल्या फेरी पासून भाजपचे उमेदवार जयकुमार रावल यांनी आघाडी घेत ती शेवटच्या फेरीपर्यंत सुरूच राहिली जातपात बाजूला सारत शिंदखेडा मतदारसंघातील लाडक्या बहिणींनी व लाडक्या शेतकऱ्यांनी आमदार जयकुमार रावल यांना भरभरून मतदान केले. एकेकाळी जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक राहिलेल्या परंतु ऐनवेळी तुतारी हाती घेतलेल्या कामराज निकम यांच्या तिळमात्र फरक पडला नाही त्यांचे मुळगाव असलेले बाम्हणे गावात जयकुमार रावल यांना 36% मते मिळाली त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर भामरे यांच्या दाऊळ गावात जयकुमार रावलनां 52% मते मिळाली व शहाणाभाऊ सोनवणे यांचा साऊर झोटवाडे इथे जयकुमार रावल यांना 71% मिळाली यावरून हे स्पष्ट होते की आपल्याच गावात या नेतेमंडळींचा प्रभाव कमी झालेला दिसून आला 
शिंदखेडा विधानसभेची निवडणूक ही चुरशीची होईल असे भाकीत काही राजकीय विश्लेषकांनी केले होते परंतु ही निवडणूक पुर्णथा एकतर्फी झाली गेल्या चारही विधानसभेपेक्षा यावेळी जयकुमार रावल यांनी विक्रमी रेकॉर्ड ब्रेक आघाडी घेऊन विजय मिळवला भाजपचे उमेदवार जयकुमार रावल यांना 66.94 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप बेडसे यांना 24.57 टक्के तर  महा विकास आघाडीचे बंडखोर  उमेदवार शामकांत सनेर यांना 5.25 टक्के मत मिळाली जयकुमार रावल यांना एक लाख 51 हजार 492 मते मिळाली तर पराभूत उमेदवार संदीप बेडसे यांना 55 हजार 606 मते मिळाली रावल यांनी बेडसे यांचा 96 हजार 471 मतांनी पराभव केला. 

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात , दोडाईंचा येथील पोलीस निरीक्षक किशोर परदेशी , नरडाणाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला

महाराष्ट्रात भाजपला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले असून या यशाचे शिल्पकार मा.देवेंद्र फडणवीस आहेत व मुख्यमंत्री ही तेच होतील असे संकेत भाजपच्या वरिष्ठांनी दिले आहेत.पाचव्यांदा आपला गड कायम राखून व विक्रमी मतधिक्य घेऊन विजयी झालेले जयकुमार रावल हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात त्यांचा कॅबिनेट मधे जयकुमार रावल यांना संधी मिळेल का ? हे बघण्याचे औत्सुक्याचे असेल

आण्णा कोळी महादेवपुरा दोडाईंचा

Post a Comment

0 Comments