भाजपाला बहुमताची जादूई संख्या गाठण्यासाठी पक्षाला केवळ १३ आमदारच कमी पडत आहेत. शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनीही जोरदार मुसंडी मारत अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना जोरदार हादरा दिला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे साफ पानिपत झाले असून प्रथमच राज्याची विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना कामकाज करेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महायुतीसमोर मविआचा सुपडा साफ
निवडणुकीच्या तोंडावर आणलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'; प्रचार रंगात आला असताना भाजपाने चर्चेत आणलेले 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' हे मुद्दे; नेत्यांमधील समन्वय आणि बूथ स्तरावर केलेले अत्यंत काटेकोर नियोजन याचा महायुतीला मोठा फायदा झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्याआडून केलेली मदतही सत्ताधारी युतीच्या पथ्यावर पडल्याचं मानलं जात आहे. दुसरीकडे घटक पक्षांमधील एकवाक्यतेचा अभाव आणि जागावाटपापासूनच अनेक मुद्द्यांवर मुख्य नेत्यांमध्ये असलेले वाद महाविकास आघाडीला भोवल्याचं निकालाअंती दिसत आहे. परिणामी विधानसभेचेविरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या २९ जागादेखील (एकूण सदस्यांच्या १० टक्के) आघाडीतील एकही पक्ष मिळवू शकला नाही.
पक्षनिहाय आकडेवारी
क्र. | पक्ष | विजयी आमदार |
1 | भारतीय जनता पार्टी – भाजपा | १३२ |
2 | शिवसेना | ५७ |
3 | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) | ४१ |
4 | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | २० |
5 | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | १६ |
6 | राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार | १० |
7 | समाजवादी पक्ष – सपा | २ |
8 | जन सुराज्य शक्ती | २ |
9 | राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष | १ |
10 | राष्ट्रीय समाज पक्ष | १ |
11 | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन | १ |
12 | भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम) | १ |
13 | भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष | १ |
14 | राजर्षी शाहू विकास आघाडी | १ |
15 | अपक्ष | २ |
0 Comments