Header Ads Widget

*ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी डॉ भावले यांच्या दारुमुक्त घर व गाव अभियान सारा फाउंडेशन ची घेतली भेट*




शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेविका, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांनी दारुमुक्त घर व दारुमुक्त गाव अभियान सारा फाउंडेशन संभाजीनगर येथे भेट घेवून कौतुक केले.
सध्या महाराष्ट्र भर दारू मुक्त घर व दारुमुक्त अभियान राबवून हजारो परिवाराच्या जीवनात औषध उपचारातून आनंद व्यक्त करणारे डॉ कृष्णा भावले, डॉ सारिका भावले यासह त्यांच्या सोबत कार्याला सहकार्य करणारे पारोळा तालुक्यातील बोळे हे गाव जन्मभूमी असलेले व सध्या अमेरिकेत अभियंता म्हणून कार्यरत असलेले कैलास गिरासे, डॉ जितू गिरासे यांच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वी केली जात असल्याने सदर कार्याची माहिती घेवून मेधाताई पाटकर यांनी डॉ. भावले
कुटुंबियांचे कौतुक केले भाऊ पाठाडे यांची उपस्थिती होती. डॉ. कृष्णा भावले यांनी मेधाताई पाटकर यांचा सन्मान केला. डॉ भावले यांनी शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावापासुन दारुमुक्त अभियानास सुरुवात केली होती पाहतापाहता महाराष्ट्र सह गुजरात मध्यप्रदेश आदी राज्यात सारा फाउंडेशन मार्फत दारुमुक्त अभियान राबवुन लाखो व्यसनाधिन व्यक्तींना मुक्ती देवुन कुटुंब उध्दवस्त होण्यापासुन वाचविले आहे विनामुल्य केवळ औषधीच्या अल्प खर्चात उपचार करुन एक वेगळी छाप निर्माण केली आहे डॉ भावले परिवाराच्या हया समाजसेवेसाठी अनेक संस्थामार्फत गौरविण्यात आले आहे त्यांचे दारुमुक्त अभियान निरंतर सुरु आहे हयापुढेही सुरु राहणार आहे

Post a Comment

0 Comments