शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
तालुक्यातील चिलाणे येथील आदर्श गाव विकास मंडळ चिलाणे ची नुकतीच सर्वसाधारण सभा अंगणवाडी सभागृहात संपन्न झाली सुरुवातीला सचिव यांनी प्रास्ताविक करतांना मंडळाचा उद्देश ग्रामस्थांना समजुन सांगितला आपला विकास गावाचा विकास या उक्तीप्रमाणे आपल्या गावाचा विकास सर्वजण मिळुन करणार आहोत सभेचे इतिवृत्त खजिनदार अमोल पवार यांनी वाचुन दाखविले त्यानंतर चिलाणेचे भुमिपुत्र शिंदखेडा तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष यादवराव सावंत व आदर्श शिक्षक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत डिगराळे यांचा विशेष कामगिरीबद्दल मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला श्री सावंत व श्री डिगराळे यांनी सत्काराला उत्तर देतांना आमचा अनेक ठिकाणी सन्मान होत असतो परंतु गावाचा कर्मभुमीचा सन्मान लाखमोलाचा असुन कायमस्वरुपी स्मरणात राहिल मंडळाने आमची घेतलेली दखल ही अस्मरणीय राहिल हयावेळी कार्याध्यक्ष प्रमोद चिलाणेकर व उपाध्यक्ष वाल्मिक पाटील यांनी मनोगतातुन गावाच्या विकासासाठी सर्वानुमते आदर्श गाव विकास मंडळाची नोंदणीकृत स्थापना केली असुन लोकवर्गणी व देणगीच्या माध्यमातुन गावातील प्रलंबीत समस्या सोडविण्यासाठी अर्थात गावाच्या सर्वागीण विकासासाठी मतभेद विसरुन विकास कसा होईल हा उद्देश मंडळाचा आहे अध्यक्षीय भाषणातुन सुरेश सोनवणे यांनी मंडळाची स्थापना का व कशासाठी याची माहिती देत गावाचा सर्वागीण विकासासाठी एकजुट होवुन आपल्याच गावातील उदयोग व्यवसाय नौकरी निमित्त बाहेरगावी स्थित दानशुर लोकांची मदत घेवुन गावाच्या समस्या सोडवु असा संकल्प हाती घेवुन सदर मंडळाची स्थापना केली आहे हयावेळी आदर्श गाव विकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश पुंडलीक सोनवणे उपाध्यक्ष वाल्मीक रोहिदास पाटील दिलीप कोमलसिंग गिरासे कार्याध्यक्ष प्रमोद पंढरीनाथ चिलाणेकर सचिव वसंत जयवंत सोनवणे सहसचिव पंढरीनाथ जंगलु अहिरे खजिनदार अमोल मधुकर पवार सदस्य राजाराम पाटील हंसराज सोनवण जगदिपसिंह परदेशी संग्रामसिंग राऊळ जगदीश पाटील प्रकाश न्हावी सुधीर आखडमल मच्छिद्र भिल या पदाधिकारीसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते सुत्रसंचलन प्रमोद चिलाणेकर व वाल्मीक पाटील तर वसंत सोनवणे यांनी आभार मानले
0 Comments