Header Ads Widget

*अभिनव उपक्रम**जनता शिक्षण प्रसारक संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय मांजरोद तालुका शिरपूर जिल्हा धुळे* येथे *ईव्हीएम द्वारे इ 10 वी* च्या वर्गात *इतिहास व राज्यशास्त्र* या विषयाच्या माध्यमातून *निवडणूक प्रक्रिया*


*अभिनव उपक्रम*
*जनता शिक्षण प्रसारक संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय मांजरोद तालुका शिरपूर जिल्हा धुळे* येथे *ईव्हीएम द्वारे इ 10 वी* च्या वर्गात *इतिहास व राज्यशास्त्र* या विषयाच्या माध्यमातून *निवडणूक प्रक्रिया* या प्रकरणाच्या अनुषंगाने शालेय स्तरावर अभिरूप मतदान प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय निवडणूक आयोग यांच्यामार्फत होणाऱ्या निवडणुका यांविषयी प्रत्यक्ष उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली.
भारतीय लोकशाहीतील महत्त्वाचा दुवा म्हणजे निवडणूक प्रक्रिया.शालेय अभ्यासक्रमात निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आलेली असते;परंतु प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडते याचे  *प्रात्यक्षिक*  महात्मा गांधी विद्यालय मांजरोद तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे *इव्हीएम द्वारे (मोबाईल ऍप) च्या साहाय्याने* मतदान घेण्यात आले. 
सदर उपक्रम हा *संस्थेचे अध्यक्ष मा. बापूसाहेब अशोक जी गुजर* यांच्या प्रेरणेने व विद्यालयाचे *मुख्याध्यापक श्री के एस पाटील सर* यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. तसेच याप्रसंगी  मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री व्ही डी गुजर सर, उप मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री जी आर पाटील सर यांनी कामकाज पाहिले. श्री आर जी पवार सर ( विषय शिक्षक इंग्रजी व इतिहास व राज्यशास्त्र) यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम घेण्यात आला.
 यात मतदान अधिकारी एक ,
दोन व तीन ही मुख्य भूमिका इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी बजावली तसेच विद्यार्थ्यांच्या बोटाला प्रत्यक्ष शाई लावून नंतर  ईव्हीएम ॲप द्वारे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी गुप्त मतदानाचा अनुभव घेतला.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे अनमोल असे सहकार्य लाभले. 
यात इ 10 वी अ व ब च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments