उद्याच्या चक्का जाम आंदोलनाला उबाठा शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी मनसे ,वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा
शिंदखेडा प्रहार संघटनेच्या वतीने उद्या दि.24 जुलै दोंडाईचा नंदुरबार चौफुली येथे चक्काजाम आंदोलन
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे शेती हा आजही एक प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय लोकसंख्येतील ६४ टक्के जनता कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे आणि त्यांतील ७० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे निवडणूक आधी महायुतीच्या नेत्यांनी शेतकरी कर्जमाफी ची घोषणा करून शेतकऱ्यांना फसविले म्हणून त्यांचे स्वास्थ्य व हित जपण्यासाठी उद्या दि.24 जुलै रोजी दोंडाईचा नंदुरबार चौफुली ये आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आव्हान प्रहार संघटनेचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष मा.पंकज भाऊ सिसोदिया यांनी केले आहे.
0 Comments