प्रतिनिधी l शिंदखेडा : शिंदखेडा येथील शेतकरी बोर्डिंग संस्थेचे प्रभारी अध्यक्षपदी हातनूर येथील पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे विश्वासू सहकारी व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक वाल्मीक दंगल पाटील यांची निवड झालीआहे .दि २२ जुलै मंगळवारी झालेल्या संस्थेच्या सभागृतील बैठकीत अध्यक्ष साहेबराव दौलतराव खरकार यांनी वैद्यकीय कारणामुळे हा ठराव एकमताने प्रारीत करून अध्यक्ष पदाची धुरा वाल्मिक पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. या शैक्षणिक कार्यकाळात संस्थेच्या हिताचा निर्णय घेतांना नूतन प्रभारी अध्यक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.संस्थेतील प्राथमिक स्तर सरस्वती विद्यामंदिर, माध्यमिक स्तरावरील किसान विद्यालय, भडणे येथील सी बी देसले विद्यालय व शेतकरी बोर्डिंग संस्थेचे वसतिगृह यांच्या कार्यभारावर नियंत्रण ठेवून संस्थेची सामाजिक, शैक्षणिक, डिजिटल स्कुल, विविध खेळात संस्थेच्या सर्व युनिटला प्रगतशील
वाटचाल करुन आपला ठसा उमटवावा लागणार आहे. संस्थेच्या बैठकीत सचिव प्रकाश पाटील, संचालक जितेंद्र देसले,भबुतराव देसले, तन्मय देसले, गोपाळराव सोनवणे आदीची उपस्थिती होती.
0 Comments