Header Ads Widget

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस् सरचिटणीसपदीप्रा. प्रकाश सोनवणे यांची फेरनियुक्ती...

धुळे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच आपली नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून शेवाळी  (साक्री, धुळे) गावाचे सुपुत्र व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व एकनिष्ठ कार्यकर्ते प्रा. प्रकाश सोनवणे यांची पुनश्च: सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. मा. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रा. प्रकाश सोनवणे यांची नियुक्ती करून  त्यांच्या काँग्रेस पक्षातील कार्यावर विश्वास प्रगट केला आहे.  धुळ्यातील राजेंद्र  छात्रालय मधून माध्यमिक शिक्षण पूर्ण  झाल्यावर, एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालयामध्ये  त्यांनी आपले बी.ए. (भूगोल) चे  शिक्षण पूर्ण  केले व तेथील शिक्षकांच्या  सल्ल्यानुसार ते मुंबई येथे पुढील शिक्षणासाठी गेले व मुंबईतील अंधेरी येथील उच्चभ्रू "भवन्स कॉलेजमध्ये" प्राध्यापक  म्हणुन नोकरीस लागले.  35 वर्षे सेवा करून उपप्राचार्य म्हणून निवृत्त झालेत. मुंबईत, त्यांचा संपर्क स्व. आ. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्याशी आला व ते शेवटपर्यंत अण्णांचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणुन त्यांच्यासोबत राहिलेत व त्यांच्यासोबतच कॉन्ग्रेस पक्षात आलेत.  काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी तत्कालीन प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. माणिकराव ठाकरे  यांच्या सोबत ‘सरचिटणीस’ म्हणुन जबाबदारी स्विकारली होती आणी चळवळीतील कार्यकर्ता म्हणुन सवयीने विविध आंदोलनात प्रा. सोनवणे अग्रेसर असायचे.  मुंबईत राहून काँग्रेस पक्षाची प्रदीर्घ काळ त्यांनी सेवा केली व राज्य पातळीवर त्यांनी स्वकर्तृत्वावर प्रदेश काँग्रेस  मध्ये आपले स्थान पक्के केले. स्व.गोविंदराव आदिक साहेब यांच्या सोबतही त्यांनी काम केले आहे. स्व.आदिक साहेब, मा.माणिकराव ठाकरे,  मा.अशोक चव्हाण यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणुन ते आजही ओळखले जातात. या नेत्यांच्या नेतृत्वाखाली सोनवणे यांनी 4 वेळा संपूर्ण महाराष्ट्रात यात्रा केल्यात त्यामुळे, प्रा. सोनवणे यांना महाराष्ट्रातील तालुका पातळीवरील काँग्रेस कार्यकर्ता ओळखतो. प्रा. प्रकाश सोनवणे हे नाभिक समाजाचे असून त्यांचे वडील शेवाळी गावात लोहारकी ( बलुतेदारी ) व्यवसाय करायचे. आपल्या जन्मगावाची सेवा व्हावी म्हणुन त्यांनी शासनाचे करोडो रुपये शेवाळी गाव व परिसरात आणून अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे अनेक स्थानिक तरुणांना रोजगार प्राप्त झाला. तसेच आपल्या मातृभूमीची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणुन त्यांनी खान्देश एज्युकेशन सोसायटी या संस्थेमार्फत साक्री तालुक्यात ( धुळे) दोन माध्यमिक विद्यालय सुरू केलीत व ती आज कार्यरत आहेत.  राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे शिक्षक विभागाचे ते आजही अध्यक्ष असून "कायम विनाअनुदानित" शिक्षकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. तसेच राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांसाठी त्यांनी 1985 साली संघटना स्थापन करून मोर्चे, बेमुदत आंदोलने,जेल भरो आंदोलन यांच्या  माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे. स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या सोबत "जनता पक्षात" असताना त्यांना 1987 साली स्पेन देशात संपन्न झालेल्या "आंतरराष्ट्रीय युवक परिषदेत स्व. जॉर्ज फर्नाडिस" यांच्यासोबत भाग घेण्याची  संधी मिळाली होती. त्या काळी त्यांनी पूर्ण युरोप  दौराही (1 महिना) केला होता व स्व.जॉर्ज फर्नाडिस  यांच्या सोबत अनेक युरोपीय देशांना भेटी दिल्या होत्या. त्याकाळी धुळ्याचे स्व.रवी देवांग हेही त्यांच्या सोबत होते. त्यांच्या सौ. डॉ. रत्नमाला ह्या मुंबईतील शासकीय होमी  भाभा विद्यापीठात पीएच्‌.डी. गाईड  म्हणुन कार्यरत असून मुले अमेरिकेत नोकरीस आहेत. कोणतीही राजकिय पार्श्वभुमी नसताना त्यांनी केलेले कार्य हे भूषणावह आहे.....  

*****


Post a Comment

0 Comments