Header Ads Widget

*पुणे येथे प्रा. विशाखा साटम यास “भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय समाज रत्न आदर्श प्राध्यापिका पुरस्कार प्रदान*


शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी:-

पुणे येथे नुकत्याच सपन्न
सोहळ्यात प्रा. विशाखा जयश्री प्रभाकर साटम यास "भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय समाज रत्न आदर्श प्राध्यापिका पुरस्कार 2025" वैशाली मार्तंड चव्हाण सहाय्यक आयुक्त महानगरपालिका पुणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मेडल, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देवुन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार दिनांक 26 जुलै 2025 रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह पिंपरी चिंचवड पुणे, येथे ए.डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम जीवन समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा 2025 या कार्यक्रमात देण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम बाबा महाराज (मठाधिपती संत बागडे बाबा आश्रम), वैशाली मार्तंड चव्हाण (सहाय्यक आयुक्त, मनपा पुणे), श्रीराम मांडरके (अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे), श्रीमती प्राजक्ता मांजुलकर (रील स्टार), कु. श्वेता परदेशी (इंटरनॅशनल मॉडेल) आणि ममता भोई (मिस इंडिया) ए.डी. फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अशोक गोराड यांचे विशेष उपस्थिती होती.
प्रा. विशाखा साटम यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी 'स्काय एज्युकेशन कोचिंग क्लासेस' ही नुसते क्लासेस नसून आज गुणवत्तापूर्ण शिक्षण, वैयक्तिक लक्ष आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन यासाठी एक विश्वसनीय आणि प्रेरणादायी शिक्षणमंदिर म्हणून ओळखली जाते. गेल्या ९ वर्षांपासून स्काय एज्युकेशन विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या पायाभरणीचं कार्य करत असून, इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने, समर्पणाने आणि कौशल्यपूर्ण मार्गदर्शन देण्यात येत आहे. या क्लासेसची खासियत म्हणजे केवळ अभ्यासक्रम शिकवणे नव्हे, तर विद्यार्थ्यांना ध्येय, आत्मविश्वास आणि यशस्वी आयुष्याची प्रेरणा देणे. 'शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे साधन नसून, व्यक्तिमत्व घडवण्याची प्रक्रिया आहे' या तत्त्वावर आधारित हे शिक्षण केंद्र आज शेकडो यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करणारे एक व्यासपीठ बनले आहे. दरवर्षी वाढणारा 100% यशाचा आलेख, पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास ही 'स्काय एज्युकेशन'ची खरी ताकद आहे. हे केवळ कोचिंग क्लास नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेले एक शिक्षणाचे मंदिर आहे. आजवर विविध महाविद्यालय, युनिव्हर्सिटी इतर संस्था व फाउंडेशन मधून माझ्या कार्याची दखल घेऊन 350 हून अधिक प्रशस्तीपत्रे, सन्मानचिन्हे, गौरवपत्रे या शिक्षण क्षेत्रासाठी प्राप्त झालेली आहे. या गुणवत्तेवर आधारित वैयक्तिक लक्ष, अध्यापन, आणि सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे शेकडो विद्यार्थी उच्च गुणवत्तेने उत्तीर्ण झाले असून त्यांच्या यशाचा माझा मोलाचा वाटा असल्याचे प्रामाणिक जाणीव त्यांना आहे. शैक्षणिक कार्याची दखल घेऊन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श प्राध्यापिका पुरस्कार 2025 ए.डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित यांच्याकडून शाल, सन्मानपत्र, गौरवचिन्ह व मेडल देऊन गौरवण्यात आले.

Post a Comment

0 Comments