Header Ads Widget

*चिमठाणे येथे कै. निलकंठ पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने 1100 वृद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम* 👉 *निलकंठेश्वर महादेव मंदिर चिमठाणेत संपन्न*.

    शिंदखेडा (यादवराव सावंत)प्रतिनिधी :-        तालुक्यातील चिमठाणे येथील गणेश कॉलनी येथे निलकंठेश्वर महादेव मंदिरात कै. निलकंठ धर्मा पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. हयावेळी चिमठाणे येथील माजी सैनिक सोनू फौजी यांसह मान्यवरांनी कै. निलकंठ पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते समस्त चिमठाणे ग्रामस्थांना 1100 वृद्राक्षाचे वाटप करण्यात आले. सिओर येथे महादेव भक्तांना जाणे शक्य होत नाही म्हणून कै. निलकंठ पाटील यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधुन सदरचा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले. चिमठाणे येथील सुर्यवंशी परिवारातील आयोजक श्रीमती हिराबाई पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील, ह. भ. प.गोपाल महाराज यांच्या संकल्पनेतुन कै. निलकंठ धर्मा पाटील व पत्रकार कै. धनंजय सुर्यवंशी, कै. पुष्पाताई पाटील यांच्या स्मरणार्थ 1100 वृद्राक्ष वाटप चिमठाणे ग्रामस्थांना केले. तसेच स्वतः ची जागा देखील महादेव मंदिर शिवालयासाठी दान दिल्याचे राजेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले. सदर कार्यक्रमासाठी माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी, कोमल फौजी, भटू फौजी, सुनील फौजी, हिराबाई पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण वाडिले, प्रवीण शिंपी सह गावातील नागरिक महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments