शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे दलवाडे पिंप्री शिवारात बुराई नदी पात्रात अवैद्य वाळू उत्खनन सुरू आहे तो त्वरित रोखला जावा यासाठी जिल्हाधिकारी यांना चिमठाणे येथील माजी सैनिक महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांनी निवेदन देवुन सदर निवेदन तक्रारी ची दखल न घेतल्यास 15 आगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सदर निवेदनातुन गेल्या २० वर्षापासून चिमठाणे बुराई नदी मधून अवैध वाळू उपसा दिवस रात्र सुरू होता आहे.तरी या नदीच्या पात्रात मोठे मोठे खड्डे पडले असून तसेच आपण जे 8 दिवस पूर्वी ज्या ठिकाणी पंचनामा केला आहे. परंतु आपण पंचनामा करून पुढे कुठल्या प्रकारचीं कार्यवाही केली नाही याबाबत जाहीर खुलासा देखील आपण केला नाही. कार्यवाही का करण्यात आली नाही ? सदर व्यक्ती वर गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? यात तहसीलदार प्रांत अधिकारी सर्कल तलाठी कोतवाल पोलीस पाटील यांचा तर समावेश नाही ना? असा प्रश्न गावातील नागरिक उपस्थित करताना दिसत आहे. प्रशासन ठोस पावले का उचलत नाही? हे गुन्हेगारी करणाऱ्या लोकाना प्रशासन तर पाठीशी घालत नाही ना ? असा देखील मोठा प्रश्न्न गावातील नागरिक उपस्थित करताना दिसत आहे. २० वर्षापासून हेच वाळूमाफिया हाच प्रकार उद्भवत असतात तरी देखील यांचे नावे आपल्या समोर येऊन यांच्यावर कुठल्याही प्रकार ची कार्यवाही प्रशासन का करीत नाही ? चिमठाणे दलवाडे दराने रोहाने रस्ता तसेच बुराई नदीच्या काठावर विविध ठिकाणी अनेक ग्रुप मिळुन वाळूचा मोठ्या प्रमाणात ठिय्या तयार करण्यात आला आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी दिलेल्या आदेशाला महसूल विभाग केराची टोपली दाखवताना दिसत आहे. असे चित्र स्पष्ट दिसत आहे. माझ्या अर्जाला १५ ते २० दिवस उलटुन झालेत तरीही अद्याप धुळे जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार यापुर्वी संबधिताकडुन अशी कुठलीही ठोस मोठी कारवाई दिसुन येत नाही यांच्यातून चित्र स्पष्ट निर्माण झालेले आहे कि यांच्यावर महसूल विभागाचा वरदहस्त नाही ना? त्यामुळे महसूल प्रशासन कारवाई करत नाही कार्यालय अपयशी ठरत आहे. वीस वर्ष झालीत त्या दिवसापासून आजपर्यंत जेवढा वाळू माफियांनी शासनाचा महसूल बुडवून शासनाची मालमत्तावर एकप्रकारे कब्जा करून चोरी केली असे महाभाग 15 ते 20 लोकांचा समावेश असून मा महोदय आपणास या अगोदर देखील अनेक वेळा पूर्वसूचना दिली आहे.
तरी आपण पंचनामे करून यांच्यावर कारवाई करण्यात का येत नाही? तसेच महेंद्र गोकुळ पाटील (सोनू फौजी) आपणास कळकळीची जाहीर विनंती करतो की आपण वाळू माफिया विरुद्ध तात्काळ कार्यवाही न केल्यास येत्या 15 ऑगस्ट रोजी धुळे जिल्हाअधिकारी कार्यालय समोर मी आत्मदहन करेल यासाठी आपणास अगोदरच अर्ज देऊन इशारा देत आहे. तरीही आपण 15 ऑगस्ट अगोदर त्यांच्यावर मकोका अंतर्गत कार्यवाही करून सदर वाळू माफिया विरुद्ध गुन्हा दाखल करावा व संपूर्ण बुराई नदी पात्र मोजण्यात यावे.
0 Comments