Header Ads Widget

मालपूर येथील सेंट्रल बँक शाखेत आध्य सर संस्थापक स्व. सोरबजी पोचखानावाला यांचा वाढदिवस साजरा.

मालपूर प्रतिनिधी.
 
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या शाखेत उद्या9/8/2025 रोजी सेंट्रल बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. सोरबजी पोचखाना वाला यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्याप्रसंगी शाखाधिकारी श्री. राकेश खांडेवाल, उप शाखाधिकारी श्री. अर्जून सोनवणे, माजी महसूल मंडलधिकारी श्री. एम .एम. शास्त्री, मिडिया पत्रकार प्रभाकर आडगाळे, कॅशियर अजिंक्य तामणकर, प्रविण आवला, देवेंद्र सोनार, भरत सावंत आदि उपस्थित होते. 
 
मालपूर व परिसरातील एकच शाखा आहे परंतु शाखा अधिकारी राकेश खांडेवाल साहेबांनी रात्रदिवस मेहनत करून मालपूर सेंट्रल बँकेचे चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. शेतकऱ्यांप्रती प्रेम असून शेतीकर्ज देखील वाटप केलेले आहे. कंजूमरांविषयी प्रेम आहे गोड बोलून समजावून गिन्हाईकांशी संबंध जपून ठेवले आहे. 
चोबीस तास एटीएम सेवा उपलब्ध केली आहे. सुटसुटित अशी लायटिंगने सजवलेली, रंगरंगोटी तालुक्यातील पहिलीच शाखा आहे अशी सुशोभित शाखेचे सर्व श्रेय राकेशजी खांडेवाल साहेबांन मुळेच झाले आहे मनुष्यबळ कमी असल्यामुळे सुट्टी चा दिवस सुद्धा बँकेत हजर असतात मात्र मालपूर व परिसरातील जनतेला सेवा उपलब्ध करून देतात. 
 
म्हणूनच सेंट्रल बैक आज उच्च स्तरावर चालली आहे.

Post a Comment

0 Comments