शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद च्या वतीने दरवर्षी जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधत सामाजात आवश्यक सेवा भाव व मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील केमिस्ट असोशियनला विशेष पुरस्कार देण्याचे आयोजन करते. जागतिक फार्मासिष्ठ दिनानिमित्त धुळे येथे विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी धुळे जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे या सोहळ्याचे आयोजन झाले. यात वर्षभरात संघटनेकडून ज्या शहरात सामाजिक आदर्श सेवाभाव जपत विविध कार्यक्रम साजरे केले जातात त्यांच्या कार्याचा सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो, यावर्षी नाशिक विभागात सर्वोत्कृष्ट सेवा कार्यासाठी शिंदखेडा शहर केमिस्ट असोसिएशनला सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार हा माजी आमवार व ऑल इंडिया केमिस्ट अॅड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद अध्यक्ष अनुलभाऊ अहिरे यांच्या उपस्थितीत देण्यात आला. शिंदखेडा शहर केमिस्ट असोशियन तर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. यांत सभासदांचे मोफत आरोग्य विमा काढत स्वतःचे व कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण करणे, साक्षरता जनजागृती करणे, त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातही धुळे जिल्हा केमिस्ट संघटनेचे संघटक सचिव हेमंत
परदेशी तसेच शिंदखेडा तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर्स डे साजरा करत शहरातील डॉक्टरांचा सत्कार करणे, जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्य जनजागृती करणे, तसेच राजमाता जिजाऊ, ज्ञानमाता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्याबाई
होळकर या आदर्श महिलाच्या कार्याबाबत माहिती देणे, विविध पुस्तके वितरण करणे, कार्य संपन्न महिलांचा सन्मान करणे, केमिस्ट कौटुंबिक स्नेहमेळाचे आयोजन करणे, देशाप्रती देशप्रेम राष्ट्र अभिमान व राष्ट्रीय ऐक्य भावना जागृतीसाठी राष्ट्रध्वज वितरणकरून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले.
याकरिता शिंदखेडा केमिस्ट संघटनेचे जेष्ठ केमिस्ट महेंद्र शहा, नामदेव माळी, लोटन सोनार यांचे मार्गदर्शन व पाठिंब्याने सदस्य नरेश गोधवानी, निखिल शहा, राजेंद्र देसले, जितेंद्र गिरासे, मनीष देसले, प्रवीण देसले, इरफान शेख, इमरान कुरेशी, रुपेश जैन, गौरव ठाकूर सह सर्व केमिस्ट अॅड ड्रगिस्ट बांधवांनी उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.
0 Comments