मुंबई येथे वारकरी साहित्य परिषदेची बैठक आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातील राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यातील वारकरी साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि धुळे जिल्ह्यातील पायी वारी दिंडी चालक उपस्थित राहण्याचे आव्हान शिदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पुना माळी यांनी केले आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय
मा ना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्व वारकरी दिंड्यांना वार्षिक वीस हजार रुपये मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे यांचा वारकरी साहित्य परिषदेतर्फे सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी कार्यक्रमास नामदार छगनरावजी भुजबळ नामदार राम शिंदे यांची उपस्थिती असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन नामदार उदय सावंत नामदार पंकजाताई मुंडे नामदार नामदार शंभूराजे देसाई नामदार नरहरी झिरवाळ मा ना संजय शिरसाट ना प्रकाश अण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मंत्रालयासमोर दिनांक 12 ऑगस्ट मंगळवारी ठेवण्यात आला आहे यासाठी महाराष्ट्र राज्याचे वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष विठ्ठल पाटील ह भ प डॉक्टर सदानंद मोरे ह भ प सदानंद शिवनीकर ह भ प नरहरी बुवा चौधरी ह भ प निवृत्ती महाराज नामदास ह भ प श्रीकांत हूलवान परिषदेचे पदाधिकारी परिश्रम घेत असून राज्यातील वारकरी दिंडी चालक तसेच वारकऱ्यांच्या समस्या प्रश्न आणि अडचणी ज्येष्ठ वारकरींचे मानधन नवीन प्रस्तावित प्रकरणे आधी विषयांवर या बैठकीत मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात येणार आहे कार्यक्रमास उपस्थित असे आव्हान शिंदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पुऩा माळी कैलास पवार ह भ प दिलीप महाराज विशाल माळी यांनी केले आहे
0 Comments