सुजाण नागरिक प्रतिनिधी श्री सी जी वारूडे
शिंदखेडा तालुक्ययातील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय या विद्यालयात नुकताच क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित, अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिवस या दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब श्री.एस.ए.कदम सर यांच्या हस्ते प्रथमतः क्रांतिकारक,जननायक बिरसा मुंडा व एकलव्य यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाचे औचित्य साधून अवयव दान प्रतिज्ञा प्रथमतः घेण्यात आली नंतर विद्यार्थ्यांनी आदिवासी गीत व क्रांतिकारकांविषयी भाषणे व्यक्त केलीत.
त्यानंतर शिक्षक- श्री.पी.आर.पाटील,श्री.एस.एस.पाटील,
श्री.सी.जी.वारुडे,आर.बी.एस.बी.भदाणे
श्री.आर.बी.गवळे,बी.जे.कदम(मॅडम) व
महेश पाटील सर आदिनींही क्रांतिकारकांविषयी, जागतिक आदिवासी गौरव दिन इ.विषयी मनोगत व्यक्त केले.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आबासाहेब यांनी क्रांती जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड मधील उलिहातु या गावी १५/नोव्हेंबर १८७५रोजी झाला होता परंतु त्यांना इंग्रज सरकारविषयी अत्यंत तिरस्कार होता.व त्यांचे गुरू स्वामी आनंद पांडे(गाव-गोडबेडा)यांनी त्यांना रामायण, महाभारतातील कथा शिकवल्या व आयुर्वेदाचे ज्ञान दिले परंतु त्यांनी (बिरसामुंडा)म्हणायचे की,"आपल्या धरतीला इंग्रजांच्या जुलमी शासनाच्या साच्यातून मुक्त करण्याची घोर प्रतिज्ञा केली व शिकार करणे सोडून दिले नंतर गावोगावी जाऊन आदिवासी समाज एकोप्याला आणुन, समाजातील लोक त्यांना "धरतीच्या देवच" समजायचे.व बिरसामुंडा म्हणायचे "मी माझ्या समाजाचा उदारकर्ता म्हणून जन्मास आलो आहे इ.विषयी तसेच "एकलव्य -द्रोणाचार्य" या गुरू शिष्य एकनिष्ठ नातं, खानदेशातील सुपुत्र खर्जासिंग नाईक,माता शब्बरी देवी इ.तसेच "करेंगे या मरेंगे " व "चले जाव चळवळ ' क्रांतीदिन इत्यादी विषयी व या कार्यक्रमाचे औचित्य साधून याप्रसंगी "अवयव दान प्रतिज्ञा " घेण्यात आली व दैनंदिन जीवनात मानवी शरीरातील 'अवयवांविषयीचे महत्त्व व पर्यावरण संवर्धन ही 'एक काळाची गरज' होय.इ.विषयीचे महत्त्व पटवून दिलेत.
यावेळी कार्यक्रमास विद्यार्थी-पालक वर्ग, मुख्याध्यापक,शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.बी.भदाणे यांना केले तर आभार श्री.आर.बी.गवळे यांनी मानले.
0 Comments