Header Ads Widget

*मालपूर येथे प्रा. आ. केंद्रात कर्करोग मोबाईल व्हेन व्दारे 97 रुग्णाची केली तपासणी.*

 
मालपूर प्रतिनिधी. प्रभाकर आडगाळे
 
शिंदखेडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात25/8/2025 रोजी मालपूर येथे मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाने कर्करोग मोबाईल व्हॅनव्दारे मालपूर, सुराय, कर्ले, आणि परसोळे या गावातील97 रुग्णांची मुख, स्तन, व गर्भाशयाच्या कर्करोगाची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्वाती राजपूत, तसेच दंतरोग तज्ञ डॉ. सागर तांबे, यांनी तपासणी करून संशयीत मुखरोग4 गर्भाशय कर्करोग,3 यांचे निदान करण्यात आले तसेच एका रुग्णास पुढील तपासणी साठी G M C धुळे येथे संदर्भित करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ. बीपीन सोनवणे व सर्व वैद्यकिय कर्मचारी आणि आशा वर्कर आशा सुपरवायझर यांनी सह कार्य केले. 
 
तसेच प्रा.आ. आरोग्य केंद्र मालपूर येथे मागील दोन महिन्यात टी.बी. मुक्त अभियानात231 लाभार्थीचे मोबाईल व्हॅनव्दारे x-ray करण्यात आले. व26 संशयीत लाभार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. आणि मालपूर येथे दरमहा शिबीर व आरोग्य तपासण्या व्दारे कैन्सर screeing, x - rey, ECG काढणे sonography मुळे रुग्ण व नातेवाईक यांनी समाधान व्यक्त केले . 
पंतप्रधान योजनेतून राहिलेल्या लाभार्थ्यानी आयुष्यमान विमा कार्ड व आभा कार्ड आशावर्कर मार्फत लवकरात लवकर काढून घेण्याचे आव्हान वैद्यकिय अधिकारी यांनी आव्हान केले आहे.

Post a Comment

0 Comments