Header Ads Widget

*शिंदखेडा शहर नाभिक समाज हितवर्धक संस्थेच्या वतीने श्री. संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी निमित्त शहरातुन भव्य पालखी मिरवणूक*

                      शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-धुळे जिल्हा नाभिक समाज हितवर्धक संस्था धुळे संलग्न शिंदखेडा शहर नाभिक समाज हितवर्धक संस्थेच्या वतीने वारकरी संप्रदायाचे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.                  सुरुवातीला बिजासनी मंगल कार्यालयात सत्यनारायण पुजा नाभिक समाजाचे युवा कार्यकर्ते सागर चित्ते सपत्नीक विधीवत पुजा करण्यात आली. त्यानंतर गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे,भिला पाटील, प्रकाश देसले,उल्लास देशमुख,प्रवीण माळी, सुभाष माळी, प्रकाश चौधरी, उदय देसले, दिपक अहिरे, अमोल मराठे, गणेश खलाणे, भैय्या पाटील यांनी संत सेना महाराज प्रतिमेचे पुजन व पालखी पुजा करुन  पालखी मिरवणुकीची सुरुवात रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आली. शिंदखेडा शहरातील बिजासनी मंगल कार्यालय, भगवा चौक, स्टेशन रोड, बस स्टड रोड, शिवाजी चौफुली, गांधी चौक,गणपती मंदिर अशी वारकरी संप्रदायाच्या परपंरेने भजन, टाळ, मुर्दुग च्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणुकीचा समारोप बिजासनी मंगल कार्यालयात केला. त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाभिक समाज हितवर्धक संस्था शिंदखेडा शहराचे अध्यक्ष विजय सैदाणे सर, उपाध्यक्ष राजेंद्र खोंडे,सचिव दिनेश बिरारी, सहसचिव मधुकर सैदाणे,संघटक हेमंत चित्ते, सदस्य तुकाराम बोरसे, लोटन चित्ते,संजय येशी, रविंद्र चित्ते,जिभाऊ चित्ते,रोहिदास मोरे,शिवाजी देवरे,शालीग्राम बोरसे, आत्माराम मिस्तरी सह 
नाभिक समाज बांधव-
सुनिल चित्ते, सागर चित्ते,
 दिनेश ठाकरे, सुदाम सैंदाणे, दिनेश चित्ते,
 सुधाकर चित्ते,योगेश निकम,भावेश चित्ते,
 योगेश सोनवणे,
 रुपेश महाले, बापू सोनवणे,कमलाकर येशी अनिल वरसाळे,.
 भोला  चित्ते,
सतिष पवार,
 घनश्याम महाले,
 शरद बोरसे,
 राजेंद्र सुर्यवंशी,
बापू सोनवणे,अक्षय सूर्यवंशी,गजानन पवार,
गोपाल बोरसे,किरण चित्ते सह समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यासाठी पांडुरंग भजनी मंडळ साळवे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments