शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- तालुक्यातील विधवा, वृद्ध,अपंग, संजय गांधी निराधार योजना यांसह रेशन कार्ड धारकांना योग्यरीत्या रेशन मिळत नाही यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा नेत तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात आले. तसेच संबंधित विषयांवर शिवसेना तालुकाप्रमुख अनिल जगताप व तहसीलदार अनिल गवादे यांच्यात बैठक होऊन चर्चा करण्यात आली संबंधित विषयांकडे लक्ष वेधण्यात आले तसेच वृद्ध अपंग विधवा यांना गेल्या अनेक महिन्यापासून योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. तरी त्यांना त्वरित लाभ मिळवून द्यावा तसेच रेशन दुकानदारांकडून काही नागरिकांना रेशन मिळत नाही मिळते तेही कमी स्वरूपात मिळत असल्याच्या तक्रारी असून संबंधित रेशन दुकानदाराशी चर्चा करून तोही प्रश्न मार्गी लावावा.सदरील समस्याचे निराकरण आठ दिवसात झाले नाही तर शिवसेना स्टाईलने शिंदखेडा तालुक्यातील लाभापासून वंचित राहणाऱ्या नागरिकांसमवेत तीव्र स्वरूपाचे तहसील कार्यालयावर जन आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख अनिल जगताप,महिला आघाडीच्या रत्नाताई गुरव,वच्छला ताई माळी,शोभाताई माळी,मगन लांडगे, खेमराज पवार, जयश्रीताई पाटील, सुमनबाई माळी, शांतीलाल पाटील,लुका मराठे,आनंदा माळी, राजेंद्र पवार,पांडू नाना वाघ, राघो नारायण पाटील, साहेबराव मराठे,शामराव वाघ,दयाराम कोळी,भाऊराव वानखेडे, मोतीलाल गिरासे, हिरालाल कोळी यांसह बहुसंख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments