शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- येथील पोलीस स्टेशनला आज दुपारी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील व परिसरात होणाऱ्या गणेश उत्सव ईद मुबारक व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता अबाधित ठेवण्यासाठी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली सदर बैठकीला शहरातील शांतता कमिटीचे पदाधिकारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ वीज वितरण कंपनीचे प्रतिनिधी संतोष अहिरे शांतता कमिटीचे सदस्य व पदाधिकारी पिलखोड चे योगी दत्तानाथ महाराज, सुनील चौधरी,प्रवीण माळी, उल्हास देशमुख,प्रकाश चौधरी, प्रा. निरंजन वेन्दे प्रा. मधुकर मंगळे, दादा मराठे,चंद्रकांत गोधवाणी, ऍड. निलेश देसले, गुलाब सोनवणे, गोपनीय विभागाचे अनंत पवार, दिनेश गोसावी, अजय मराठे सह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एड. निलेश देसले, सुनील चौधरी, प्रकाश चौधरी, प्रा. निरंजन मेंदे प्रा. मधुकर मंगळे, प्रवीण माळी, आदींनी मनोगतातून शिंदखेडा शहर हे आधीपासूनच शांतता प्रिय शहर असून कोणताही अनुचित प्रकार घडत नाही यापुढे घडू देणार नाही तसेच शहरात गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी आपल्या मंडळाची सुरक्षा आपणच करावी तसेच वीज वितरण कंपनी यांनी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा,सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायत विभागाने शहरातील मुख्य रस्त्यांची डागडुजी करून रस्ता सुरळीत करावा तसेच जुना पुल च्या तुटलेल्या कटड्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी यावेळी केली. यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी होवु घातलेल्या पोळा,गणेश उत्सव, ईद मिलाद व इतर सणांसाठी शांतता राखण्याचे आवाहन केले सोबत डीजे व लेझर लाईट वर कायदेशीर बंदी असल्याने तसे आढळून आल्यास संबंधित मालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याचे मंडळ पदाधिकाऱ्यांना केले. पारंपारिक वाद्याचा वापर,धार्मिक भावना दुखावणार नाही अशी गाणी वाजवू नयेत किंवा हट्ट करू नये.पोलीस प्रशासनाकडून योग्यती काळजी घेऊन सुरक्षा ठेवण्यात येईल तसेच शांतता कमिटी पदाधिकारी व मंडळ पदाधिकारी यांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सदर शांतता कमिटी साठी गोपनीय विभागाचे अनंत पवार, दिनेश गोसावी सह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments