शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिंदखेडा पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री डी एस सोनवणे यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या दिवसाचे गणेश आरती करण्यात आली.सदर कार्यक्रम प्रसंगी शिक्षण विभागाचे संगणक
ऑपरेटर श्री योगेश महाजन,पोषण आहार विभागाचे श्री तुषार गिरी,श्री अजित सांगळे प्राचार्य श्री एस एस पाटील पर्यवेक्षक श्री बी जे पाटील,ज्येष्ठ शिक्षक श्री एस ए पाटील श्री डी एच सोनवणे श्री जे डी बोरसे, तसेच गणेश उत्सव समिती प्रमुख श्री एम डब्ल्यू तमखाने,उपप्रमुख श्री आर यू पाकळे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी श्री डी एस सोनवणे यांनी शिक्षकांना गणेशोत्सवासाठी शुभेच्छा देत या शैक्षणिक वर्षात शाळेचा विकासाचा आलेख उत्तरोत्तर वाढत राहो अशा शुभेच्छा देत गणरायाची स्थापना केल्याबद्दल अभिनंदन ही केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले.
0 Comments