Header Ads Widget

जीवघेणा डी जे चा अतिरेकी आवाज कायमसवरुपीबंद झालाच पाहिजे"""""""''"""""""""महेश बाबा घुगे """"""""""""""""""""


धुळे---कोणताही आनंदोत्सव साजरा 
करण्यासाठी विद्यमान तरुणाईला " डि जे " चा  "थय थयाट "अत्यावश्यक झाला आहे.  
दारु वाईट नाही  पण तीचा 
अतिरेक माणसाचा जीव घेते.
त्या प्रमाणे डी जे  वाईट नाही पण , त्याचा  आवाजाचा अतिरेक माणसाच्या जीवावर उठला आहे. न्याय देवताही या मूद्दयावर ठाम आहे . 
डी जे च्या अतिरेकी आवाजाने  माणसाचं स्वास्थ्यच धोक्यात आणल्याने 
माणसाच्या आरोग्य रक्षणार्थ योगदान देणारे धुळ्यातील  धन्वंतरीच आता, प्राण घातक डी जे चा अतिरेकी आवाज कायम स्वरुपी बंद करण्यासाठीरस्त्यावर उतरत आहेत. डीजेच् या अतिरेकी आवाजाने मानवी स्वास्थ्य धोक्यात आणल्याच्या घटना पदोपदी घडत आहे. हा धोका ओळखून, या पासून समाज मनाची  सुटका होण्य साठी उल्हास नगर मधील सामाजिक कार्यकर्त्या सरिता
खानचंदानी या सतत् प्रयत्नशिल होत्या पण  आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही हे लक्षात येताच,
 या नैराश्य पोटी त्यांनी काल सातव्या मजल्यावरुन  स्वतः ला झोकून देऊन या मागणीच्या पूर्ततेसाठी  स्वतःच्या प्राणाची आहुती दिली.  
परवा मीरज शहरात गणरायाच्या स्वागता साठी 
कार्यरत डी जे च्या अतिरेकी
आवाजाने बाबासाहेब कलगुटकी नावाच्या ईसमाचा
स्वागत मिरवणुकीतच बळी घेतला. 
डी जे घ्या प्राण घातक धोक्याची गंभीर दखल, धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक 
श्रीकांत धिवरे यांनी घेतली व कोणत्याही कार्यक्रमाला डी जे च्या अतिरेकी आवाजाला कायद्याने बंदी घातली.
धुळे शहरातील तमाम धन्वंतरीही आज सकाळी नऊ वाजता या जीवघेण्या वीजेचा
आवाज कायम स्वरूपी बंद व्हावा म्हणून मूक मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला साकडे घालणार आहेत. शांतताप्रिय धुळेकरांचाही त्यांच्या मागणीला दूजोरा असणार हे सांगणे न लगे.

Post a Comment

0 Comments