Header Ads Widget

*शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मौजे मेथी येथील आमरण उपोषण कर्ते व शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे मागे घ्यावेत म्हणून शिंदखेडा पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक यांना दिले निवेदन*

शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली  मौजे मेथी ता. शिंदखेडा जि. धुळे येथे मेथी गावातील शेतकरी आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी टाटा पॉवर कंपनी मेथी समोर दिनांक १९/ ०८/२०२५ पासुन सनदशीर मार्गाने आमरण उपोषणाला बसले असता महानिर्मिती व टाटा पाॅवर राज्य वीज निर्मिती कंपनीचे उपमुख्य अभियंता शैलेंद्र रामचरण गाजलेवार यांनी आमरण उपोषण कर्ते देविदास पारधी, जयपाल गिरासे व शेतकरी बन्सीलाल सोनवणे, संजय मालचे,सागर अहिरे व ज्ञानेश्वर गिरासे यांच्या वर राजकिय दबावाखाली येऊन भारतीय न्याय सहिता कलम २०२३ चे विविध कलम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ अन्वये गुन्हा दाखल केला म्हणुन आज दिनांक २४/०८/२०२४ वार रविवार रोजी सकाळी ११:३० वाजता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक शिंदखेडा येथे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, उपोषण कर्ते व शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेतले पाहिजे, मुर्दाबाद मुर्दाबाद महाजन को कंपनी मुर्दाबाद,या निगरगट्ट शासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देत निवेदन देण्यात आले त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की ही फिर्याद खोटी आहे कारण की फिर्यादी शैलेंद्र रामचरण गाजलेवार हे दिनांक २१/०८/२०२५ रोजी टाटा पॉवर कंपनी मेथी येथे उपस्थित नव्हते तसे टाटा पॉवर कंपनीने जे सिसिटिव्ही कॅमेरे बसविले आहेत ते चेक करू शकतात कारण की उपोषण कर्ते हे दिनांक १९/०८/२०२५ पासुन उपोषण स्थळी बसले आहेत त्यांच्या पोटात अन्नचा एकही कन देखील पोटात गेलेला नाही तर दे टाटा पॉवर कंपनीत जाऊन दम देणे किंवा शिवीगाळ करण्यासारखे कृत्य कसकाय करतील परंतु त्यादिवशी मेथी गावातील काही शेतकरी टाटा पॉवर कंपनीत जाऊन विनंती केली होती कि कंपनी चे वरीष्ठ अधिकारी व उपोषण कर्ते ची बैठक चालु आहे आम्हाला आमच्या विहीरींचे पैसे मिळाले नाही खरीदीच्या अटि शर्तीचा महाजनको कंपनीने भंग केला आहे म्हणुन जो पर्यंत उपोषण कर्त्याना न्याय मिळत नाही तो पर्यंत कृपया टाटा सोलर कंपनीने शेतकऱ्यांना सहकार्य करावे तुमच्या बद्दल आमच्या मनात काही विरोध नाही. ज्या दिवशी कंपनी चे वरीष्ठ अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक होऊन समाधान कारक चर्चा होईल त्या दिवसानंतर तुम्ही तुमचे काम काज चालु करु शकता तो पर्यंत कृपया सहकार्य करावे अशी विनंती गावातील काही शेतकरी यानी केली होती तसे व्हिडिओ व फोटो आपले पोलिस कर्मचारी कडे पुराव्यानिशी आहेत त्यावेळी कुठलेही प्रकारचा गैरव्यवहार किंवा कुणाला मार हान, शिवीगाळ किंवा दम दिला नाही तरी शैलेंद्र रामचरण गाजलेवार यांनी खोटी फिर्याद दाखल केली असुन हे गुन्हे मागे घेण्यात यावेत 

तसेच महानिर्मिती कंपनिचे उपअभियंता साहेब हे एकीकडे उपोषण कर्ते व शेतकऱ्यांची मुंबई येथे बैठक लावतात व इकडे उपोषण कर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करतात जर उपोषण कर्त्यांवर गुन्हे असतील तर मुंबई येथे बैठकिला येणार कसकाय याचा अर्थ शेतकऱ्यांना न्याय हक्क देण्याचे फक्त सोंग केले जात असल्याचे दिसून येत आहे कारण की यात ९०% शेतकरी व उपोषण कर्ते अनुसूचित जाती जमाती चे आहेत व १०% शेतकरी इतर आहेत या दुचीत भावनेने अनुसूचित जाती जमाती च्या लोकांना तुच्छतेची वागणुक दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

त्याच प्रमाणे उपोषण च्या एक दिवस आधी म्हणजे दिनांक १८/०८/२०२५ रोजी उपोषण कर्ते जयपाल गिरासे यांचा भाऊ ज्ञानेश्वर गिरासे ऊर्फ आप्पा गिरासे यांना टाटा सोलर कंपनीत बोलाऊन पोलीस कर्मचारी यांनी मारहाण करून दम दिला होता की उद्या जर उपोषण स्थळी येऊन उपोषण कर्त्यांना सहकार्य केले तर हात पाय तोंडुन टाकु असा दम देऊन दिवसभर टाटा सोलर कंपनी मध्ये कोंडून ठेवले होते त्यावर ज्ञानेश्वर गिरासे यानी पोलिस स्टेशन येथे फिर्याद नोंदवण्यासाठी गेले असता त्यांची फिर्याद नोंदविली नाही व काल दिनांक २३/०८/२०२५ रोजी दोंडाईचा सोनगिर रस्त्याचे काम चालू असता मेथी येथील खदान विरोधात उपोषण कर्तेचा मुलगा नरेंद्र धोबी हा तेथील हिन्दी भाषीक कामगारांना सांगायला गेला कि या काॅक्रिट कामावर आपण पाणी का मारत नाही त्यावर त्या हिंदी भाषीकानी नरेंद्र धोबी ला खुप मारहाण केली.याचा अर्थ या तालुक्यात जे चालत आहे त्या बद्दल कुणीच काही बोलायला नको बोलले तर मारहाण केली जाते तरी या ठिकाणी पुर्णपणे हिटलर शाही चालवली जात असल्याचे दिसत आहे.

तरी वरील सर्व घटनेची सखोल चौकशी करून उपोषण कर्ते व शेतकऱ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत व फिर्यादी आपल्या पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवन्यासाठी कधी आला आहे व कधी फर्याद नोंदवली यांची आपण आपल्या सिसिटिव्ही कॅमेरा मधील व्हिडीओ आम्हाला मिळावा व तुमच्या कडे देखील सुरक्षित ठेवावे असे सांगितले व निवेदन दिले  त्याच बरोबर आज दुपारी आमरण उपोषण कर्त्या निर्मला देविसिंग भिल यांची आज अचानक बिपी वाढली व शुगर ६० वर येऊन गेली होती त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता म्हणुन त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दोंडाईचा येथे आणले व अध्याप त्यांच्या जिवाला धोका आहे कारण की शुगर ६० % वरती आली होती म्हणुन ते बेशुद्ध पडले होते तरी त्यांच्या जिवाला धोका आहे असे डॉ सांगितले तरी त्यावेळी शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, सर्जेराव पाटील, गिरीश देसले, संतोष देसले, ईश्वर पाटील, शैलेश सोनार, योगेश पाटील, योगेश गिरासे, बन्सीलाल सोनवणे, संजय मालचे, मोहन पारधी, प्रभाकर भिल, राजु पारधी, गणेश आगडे, विशाल पारधी, रविंद्र दाभाडे, ज्ञानेश्वर भिल, प्रकाश सोनवणे, प्रकाश माळी, तुळशीराम अहिरे, देवराम सोनवणे, प्रविण माळी, जगतसिंग गिरासे,राजकोर पारधी,धुपाबाई भिल, लताबाई भिल,खटाबाई पारधी, निर्मला बाई पारधी,पुनम पारधी,सिंधुबाई पारधी, कल्पना चव्हाण,सविताबाई माळी,मंगलबाई भिल सह मेथी गावातील अनेक गावकरी,महिला व शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments