Header Ads Widget

बेटावद येथील अज्ञात इसमाने मिर्ची चा शेतात विषारी तणनाशक फवारणी शेतकऱ्यांचे लाखोंची नुकसान


आसिफ पठाण बेटावद प्रतिनीधी 

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे शेतकरी दोधू विठ्ठल माळी व मनोज दोधू बोरसे यांच्या शेतात गट क्र. 374/1 या शेतामध्ये  लावलेले सुमारे दिळ ते दोन एकरांवरील दीड महिन्याचे गौरी मिरचीचे उभे पीक अज्ञात इसमाने शेतातील उत्तम स्थितीत उभी असलेली मिरचीला अत्यंत विषारी कीटकनाशक फवारणी  करून  झाडे नष्ट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याच्या अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

शेतकरी आपल्या मुलाबाळांप्रमाणे शेतातील झाडाची काळजी घेत असतो परंतु काही माथेफिरू अज्ञात इसम असे कृत्य करत असेल तर मात्र याला काय म्हणावे असा सवाल शेतकरी विचारत आहे एक वेळ ही गोष्ट जर निसर्गाच्या माध्यमातून झालेली असते तर त्या शेतकऱ्याला तितके दुःख झाले नसते. मात्र, एखाद्याच्या हेतुपुरस्कर उद्देशाने हे अमानुष कृत्य केलेले असेल तर त्याला अद्दल घडावी असे मत शेतकरी यांच्याकडून करण्यात येत आहे

दीड महिन्यापासून मनोज बोरसे यांनी मिरची पिकाची मशागत, सिंचन व देखभाल करून पीक जोपासले होते परंतु,  तय्यार झालेली मिरची ऐन वेळेस अज्ञात व्यक्तीने फवारण करून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे

या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या पिकांवर अशी विध्वंसक कृत्ये होत राहिल्यास शेती करणे धोकादायक ठरेल, असे शेतकरी वर्गात बोलले जात आहे
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, अशा घटनांमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था अधिकच डळमळीत आहे
 प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने भरपाई द्यावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments