आसिफ पठाण बेटावद प्रतिनीधी.
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व आदर्श प्राथमिक शाळा बेटावद येथे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य प्रा.पी.के. पाटील हे होते त्यांनी अध्यक्ष भाषणात श्री. सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा जीवनपट उघडला त्यांच्या लीळांच महत्त्व सांगितले चक्रधर स्वामींच्या तत्वातील सत्य, अहिंसा, सर्वधर्मसमभाव, परीत्याग इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांनी कसे अवलंबल्या पाहिजेत याचे महत्त्व विशद केले बहुतेक शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन पाटील सर, प्रास्ताविक प्रा.हिंमत शिरसाट, व फलक लेखन मनोज ढिवरे सर व आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहकार्य लाभले विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments