शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
शिंदखेडा शहरासाठी नवीन उधना शिंदखेडा, दोंडाईचा, जळगाव, पुणे ही नवीन रेल्वे प्रवासी गाडी सुरू करून शिंदखेडा रेल्वेगाड्या थांबा मिळावा या मागणीचे शिंदखेडा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रमुख धुळे जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ पाटोळे यांनी सामाजिक न्याय व अधिकारिता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन दिले. तालुक्यातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी शैक्षणिक व इतर कामानिमित्त मोठ्या संख्येने पुणे येथे खाजगी वाहनाने किंवा ट्रॅव्हल्स जात असल्याने मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो त्यासाठी नागरिकांच्या हितासाठी हे तालुक्याचे ठिकाण असून जवळ शिरपूर तालुका आहे, व्यापारी पेठ असल्याने पुण्यात जाणे येणे असते शैक्षणिकदृष्ट्या विदयार्थी पुण्यात जात असतात त्यादृष्टीने वरील मार्गावर रेल्वे सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात सोयीचे होणार आहे.
शिंदखेडा लगत दोंडाईचा शहर असून सोनगीर, नरडाना एमआयडीसी असल्याने सर्वच नागरिकांना रेल्वे महत्त्वपूर्ण ठरणार आहे विद्यार्थी व नागरिकाच्या हितासाठी नवीन उधना शिंदखेडा, दोंडाईचा, जळगाव, पुणे रेल्वे प्रवासी सुरू करण्यात यावी. उरी अहमदाबाद एक्सप्रेस गाडी क्रमांक १२८४३, १२८४४, भागलपुर सुरत एक्सप्रेस गाडी क्रमांक १२९४७, २२९४०, प्रेरणा एक्सप्रेस रेल्वे गाडी क्रमांक २२१३७, २२१३८, बोराणी एक्सप्रेस रेल्वे गाडी क्रमांक ११४८३, ११४८४ या प्रवासी रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यापुर्वी रेल्वे मंत्रालयाकडे अनेक वेळा मागणी केली आहे मात्र सातत्याने दुर्लक्ष झाले आहे या रेल्वे एक्सप्रेस गाड्यांना शिंदखेडा रेल्वे स्थानकावर थांबा देणे अत्यंत आवश्यक आहे. शिंदखेडा शहर व परिसरातील नागरिकांच्या मागणीची शिंदखेडा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख युवा कार्यकर्त्याची मागणी त्वरित दखल घेऊन सदर रेल्वे एक्सप्रेस सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना शिंदखेडा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा यासाठी मा.रेल्वेमंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली यांना आपल्या स्तरावर पत्र पाठवण्यात यावे विषयांवर अनुषंगाने आपल्या स्तरावरून तात्काळ दखल घेऊन
योग्य ती कार्यवाही करावी
संजय अभिमन पाटोळे
उपाध्यक्ष, धुळे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सह पदाधिकारी यांनी केलि आहे.
0 Comments