Header Ads Widget

दिवाळी नंतर म्हणजे ऑक्टोबर अखेर नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरवात होणार


मुंबई --राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची घोषणा जवळपास झाली आहे. ऑक्टोबर अखेर नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकियेला सुरुवात होणार आहे.


पुढील चार महिन्यात टप्प्याटप्प्याने निवडणूक प्रक्रिया संपणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसणार असंही निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. यामुळे मतदान केल्याची पावती मिळणार नाही.

दिवाळी नंतर म्हणजे ऑक्टोबर अखेर नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरवात होणार आहे. पुढील चार महिन्यात टप्प्याटप्प्याने निवडणूक प्रक्रिया संपणार अशी माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. इलेक्शन फेज नुसार घेतले जाणार आहे. 1 जुलै 2025 नुसार जी मतदार यादी आहे त्या परवानगी नुसार मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. प्रारूप प्रभाग रचना नुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो बांटी आयोग नुसार काम केले जाते.

OBC आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमचे काम थोडे सोपे झाले आहे. मागील निवडणुकीतही OBC आरक्षण होते. Sc, st चे आरक्षण हे ठरलेलं असते परंतू OBC आरक्षण हे लॉटरी पद्धतीने काढले जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक साठी VVPAT मशीन वापरली जाणार नाही अशी माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. VVPAT मशीन म्हणजे 'व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल' म्हणजे 'खात्रीदर्शक मतदान पावती यंत्र'. मतदारांनी मतदान केल्यानंतर VVPAT मशीनमधून पावती बाहेर येते. या पावतीमुळे मतदान केल्याची खात्री होते.

Post a Comment

0 Comments