Header Ads Widget

राज्यात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे माध्यम विश्वात अस्वस्थताराजकीय वरदहस्त,पोलीसांच्या धाकाची दडपशाही सहन करणार नाहीमुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा राज्यकर्त्यांना इशारा



 

मुंबई- पत्रकारिता करणे महाराष्ट्रात उत्तरोत्तर कठीण होत आहे.. पत्रकारावर हल्ले होताहेत, खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे माध्यम विश्वात मोठी अस्वस्थत: आहे.कर्जत येथून आलेली बातमी अशीच आहे.. खालापूर तालुक्यातील सावरोली येथील के. डी. एल. बायोटेक औषध उत्पादन कंपनी बंद होऊन बारा वर्षे झाली तरी कामगारांना त्यांचा हिशोब मिळत नाही.. त्या विरोधात कामगारांनी 2 जुलै 2025 रोजी कंपनीच्या गेटसमोर जमा होत निदर्शने केली.. कामगार नेत्यांनी तेथे जी भाषणं केली ती  ‘संवाद’  मराठी चॅनल वरून लाईव्ह दाखविली गेली.. हे पत्रकारांचे कामच आहे.. असं असताना संकेत भासे यांनी पत्रकार बाबू पोटे यांनी आपली बदनामी केली म्हणत पोलिसांकडे तक्रार केली आहे.. पोलिसांनी देखील पत्रकार बाबू सीताराम पोटे यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे.. एखाद्या सभेच्या ठिकाणी जे घडलं त्याची बातमी देणं पत्रकारांचं कामच आहे.. यात कोणाची बदनामी करण्याचा प्रश्न कुठे येतो?  तरीही पत्रकारांच्या विरोधात पोलिसात तक्रारी देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न संतापजनक आणि निषेधार्ह आहे..राजकीय वरदहस्तातून आणि पोलिसांचा धाक दाखवत सुरू असलेली ही अरेरावी राज्यातील पत्रकार  खपवून घेणार नाहीत.. असा इशारा मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिला आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषद, रायगड प्रेस क्लब आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने  याचा निषेध केला आहे.

 


Post a Comment

0 Comments