Header Ads Widget

*आरटीओ विभागातील बनावटगिरी थांबता थांबत नाही!*





 *धुळे* जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्हे व राज्यभरातील एकूणच आरटीओ विभागाची झाडाझडती राज्य शासन करीत नसेल तर आता इडी आयकर सारख्या केंद्रिय संस्थांनी या विभागाच्या भ्रष्ट्र मंडळींना एकदा रडारवर घेतले पाहिजे. हा विभाग किती - किती प्रकारे भ्रष्ट्राचार करतो, याला लिमिट नाही. मध्यंतरी चाळीसगावच्या आमदारांनी ट्रकवाल्यांना घेवून रस्त्यावर या आरटीओंची त्यांच्या समोर पोल खोलली होती. ज्या ट्रकवाल्यांनी मासिक हप्ता दिला आहे त्यांचे नाव नंबर असणारे एक्सल शीट बनते. त्या ट्रकांना अडविले जात नाही. सरळ सोडले जाते. पूर्वी चेकपोस्ट वर परप्रांतिय व स्थानिक ट्रक वाल्यांना विशिष्ठ कुपन घ्यायवयाची पद्धत होती. असे कितीतरी कुपन प्रसिध्द करून आम्हीच उघडकीस आणले होते. आरटीओ कार्यालयांमध्ये खाजगी अवैध एजंट व आरटीओ एजंट यांचा कोडवर्ड असतो. पूर्वी ट्रकवाल्यांचाही कोडवर्ड अजावयाचा. एखाद्या ठिकाणी आरटीओची गाडी उभी असेल, तर त्या आरटीओला  तुकडा फेकून ट्रक ड्रायव्हर पुढे गेला, की पुढे प्रत्येक ट्रक ड्रायव्हरला 'ठोला खडा है।' असे कोडवर्ड मध्ये बोलून सावध करीत असे. या आरटीओ यंत्रणे मध्ये अवैध खाजगी एजंटांच्या माध्यमातूनही भ्रष्ट्राचाराचे नवनवे मार्ग आरटीओ अधिकार्‍यांकडून अंमलात आणले जातात. आता जळगाव मध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. कुणाच्या ध्यानी मनी नसेल असा प्रकार शोधून काढण्यात आला आहे. शाकीब रहूब शेख या इसमाना त्याच्या, एमएच १८, बीए ०२२१ या वाहनाचा राष्ट्रीय परवाना रद्द करण्यासाठी प्रादेशिक कार्यालयात अर्ज केला होता. यात ऑन लाईन व्यवसाय कर भरल्याची पावती जोडण्यात आली होती. ती बनावट आढळून आल्याने गुन्हा दाखल झाला आहे. तीन वर्षपूर्वी याच प्रकारे कर्की तपासणी नाक्यावर बनावट पावत्यांचे प्रकरण उघडकीस आले होते. आता या बोगस पावत्या प्रकरणी रामानंद नगर पोस्टेला गुन्हा नोंद झाला. आता पुन्हा चोपड्या च्या एका संस्थेच्या वाहनाच्या व्यवसाय कराच्या बोगस पावत्यांचे प्रकाण समोर आले आहे. कोण हे ज्ञान देतो? आरटीओ यंत्रणा किंवा अवैध खाजगी एजंट यांच्या द्वाराच हे ज्ञान वाहन धारकांपर्यंत पोहोचविले जात असेल, यात शंकाच नाही. वारंवार याप्रकारच्या बोगस पावत्यांची प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यामुळे जळगाव प्रादेशिक अधिकारी यांनी आता गेल्या दीड वर्षातील सर्व पावत्या तपासणीचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत साडे तीन हजार पावत्या तपासल्या गेल्या. अजुन तपासल्या जातील. त्यातून फार मोठ्या प्रमाणावर बनावट पावत्यांची प्रकरणे उघडकीस येणार आहेत. आरटीओ मधील हे देखिल नव्या प्रकारचे स्कॅम आहे. केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांसह राज्यभरातच  याप्रकारे बनावट पावत्यांची प्रकरणे उघडकीस येवू शकतात. त्यामुळे राज्य शासनाने आता राज्यभर अशी तपासणी मोहिम आखावयास काहीही हरकत नाही. आता समाजात एक निर्ढावलेपण आले आहे. आता कॅमेरा समोर चोरी व गुन्हे करावयास लोक घाबरत नाहित. कागदोपत्री उघड होणारे व साबित होणारे गुन्हे करावयास अधिकारी - कर्मचारी - पुढारी व लोकही घाबरत नाहित! कुठे जात आहे हा समाज?
 
( *योगेंद्र जुनागडे,* धुळे )


Post a Comment

0 Comments