Header Ads Widget

**जवाहर नूतन विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला*

 *वारूड* : येथील जवाहर नूतन विद्यालयात  राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला . पा  प्रसंगी हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन विद्यालयाचे   मुख्याध्यापक श्री महाले सर  यांच्या हस्ते  करण्यात आले  या प्रसंगी क्रिडाशिक्षक श्री  हेमंत भदाणे सर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या महान कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगीतली तसेच विद्यार्थी दशेतील  खेळाचे महत्व  स्पष्ट केले या वेळेस शाळेचे पर्यवेक्षक श्री के डब्ल्यू निकम  सर व्यासपिठावर उपस्थित होते   . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी डी पाटील सर यांनी केले . या वेळेस मुख्याध्यापक यांच्या हस्ते क्रिडाशिक्षक श्री भदाणे सर त्याप्रमाणे कब्बडी खेळाचे  प्रशिक्षक चेतन बिराडी सर यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले .🙏🙏🙏

Post a Comment

0 Comments