Header Ads Widget

*शिंदखेडा ए.पी.आय श्री दिपक ढोके यांच्या हस्ते जनता हायस्कूलमध्ये तिसऱ्या दिवसाची श्रीं ची आरती.*

    शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व गायत्री माता प्री प्रायमरी सीबीएससी स्कूल मध्ये तिसऱ्या दिवसाची श्री गणेशांची आरती शिंदखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिपक ढोके यांच्या शुभहस्ते करण्यात आली. याप्रसंगी हेड कॉन्स्टेबल श्री शिरीष भदाणे श्री आनंद पवार यांच्यासह प्राचार्य श्री एस एस पाटील पर्यवेक्षक श्री बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक श्री एस के जाधव श्री एस ए पाटील श्री डी एच सोनवणे गणेश उत्सव समिती प्रमुख श्री एम डब्ल्यू तमखाने उपप्रमुख श्री आर यु पाकळ ज्येष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 
   श्री दिपक ढोके यांनी विद्यार्थी संख्या व उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व जीवनात निर्व्यसनी राहावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments