Header Ads Widget

*धर्मवीर संभाजीराजे गणेश उत्सव मित्र मंडळ दोंडाईचा यांच्या तर्फे* *भव्य रांगोळी व संगीत खुर्ची स्पर्धा संपन्न*

दोंडाईचा (दि.29) : गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा जपत धर्मवीर संभाजीराजे गणेश उत्सव मित्र मंडळाने महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धा व संगीत खुर्चीचे आयोजन केले.यामागील मुख्य हेतू म्हणजे युवती , महिलांच्या हातातील कलेला वाव मिळावा म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला भरपूर महिलांनी व युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धा याचे उदघाटन दोंडाईचा शहरातील
 सुप्रसिद्ध डॉ.मंडाले यांच्या मातोश्री सौ.अनिताताई मंडाले व  धर्मवीर संभाजीराजे गणेशोत्सव मित्र मंडळाचे आधारस्तंभ तथा मराठा क्रांती मोर्चा चे दोंडाईचा अध्यक्ष मा.विजू बापू पाटील यांच्या शुभहस्ते झाले. या  स्पर्धेत रांगोळी कलाकारांनी काढलेल्या डोळ्यांचे पारने फेडणाऱ्या अप्रतिम कलेतून सर्वांना आकर्षित करून आपल्या रांगोळीतून सामाजिक संदेश दिला.कार्यक्रमाचे आयोजक धर्मवीर संभाजीराजे मंडळाचे संस्थापक युवराज पैलवान, गणेश मंडळाचे अध्यक्ष विक्की भाऊ कोळी उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे व सर्वात जास्त सामाजिक कामात रस असलेले व धर्मवीर संभाजीराजे मंडळाचा महत्त्वाचा दुवा विकास भाऊ पाटील , विशाल पाटील , तुषार पाटील विकास पाटील, सागर मराठे, आकाश पाटील व मंडळाचे सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला..सौ.अनिताताई मंडाले यांनी निरीक्षक म्हणून भूमिका साकारून सहभाग घेतलेल्या स्पर्धकातून उत्तमरित्या रांगोळ्यामधून प्रथम , द्वितीय ,तृतीय क्रमांक निवडून त्यांना बक्षीस देण्यात आले. धर्मवीर संभाजी राजे मंडळाचे संस्थापक युवराज भाऊ पहेलवान यांनी शाल व श्रीफळ देऊन सौ.अनिताताई मंडाले यांच्या सत्कार केला. यावेळी मा.विजू बापू पाटील व सौ.अनिताताई यांनी आपले मनोगत व्यक्त करून महिलांना व युवतींना मार्गदर्शन केले.

 *आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*

Post a Comment

0 Comments