सुजान नागरिक प्रतिनिधी श्री.सी.जी.वारूडे
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित,अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात २९ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हाॅकी खेळाचे नामांकित खेळाडू व हाॅकी खेळाचे जादुगार मेजर ध्यानचंद सिंग यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जातो.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम सर यांच्या हस्ते हाॅकी खेळाचे विश्व खेलरत्न मेजर ध्यानचंद सिंग यांच्या प्रतिमेचे व खेळ साहित्य पूजन करण्यात आले तद्नंतर कबड्डी व खो -खो खेळ मैदान यांचेही पूजन करण्यात आले.
तद्नंतर विद्यार्थ्यांनी यांनी खो-खो खेळ खेळतांना आलेले स्वानुभव व राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या उत्कृष्ट खेळाडू विषयी मनोगत व्यक्त केलेत. तसेच विद्यालयातील क्रीडा शिक्षक-श्री.सी.जी.वारूडे यांनी हाॅकीचे जादूगर मेजर ध्यानचंद सिंग,कुस्तीचे खाशाबा जाधव यांच्या जीवनशैलीवर तसेच ऑलिंपिक व देशपातळीवर खेळणाऱ्या खेळाडू विषयी मनोभाव व्यक्त केलेत.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रेरणास्रोत मार्गदर्शक मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम म्हणालेत की,मेजर ध्यानचंद सिंग कोण होते? मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ऑगस्ट १९०५रोजी अलाहाबाद येथे झाला.तरुण वयातच ते लष्करात दाखल झाले परंतु विद्यार्थीदशेत त्यांना हाॅकीची आवड मुळीच नव्हती सैन्यात गेल्यावर मात्र त्यांना या खेळाची आवड झाली,त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले सैन्याच्या हाॅकी संघातून खेळणारे ध्यानचंद भारताच्या संघाकडून खेळायला लागले १९२६मध्यल्या न्यूझीलंडच्या पहिल्याच दौऱ्यात त्यांच्या हाॅकी स्टीकची आणि एकाग्रतेची,सहज चेंडू वळवायच्या जादुगाराची चमत्कार लाखो प्रेक्षकांनी पाहिला आणि ते अक्षरशः वेडे झाले म्हणून त्यांना हाॅकीचे जादूगार म्हटले जायचे त्यांनी आपल्या अप्रतिम हाॅकी कौशल्याने जगाला चकित केले त्यांनी भारताला ऑलिंपिक मध्ये १९२८ते १९६४ दरम्यान झालेल्या ०८ ऑलिंपिक स्पर्धेपैकी ०७ सुवर्ण पथक आपल्या भारताला मिळवून दिलेत व त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत जवळ-जवळ ५८०गोल केले. सर्वाधिक गोल केले ते हाॅकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले म्हणून भारत सरकारने १९५६ साली "पद्मभूषण"पुरस्काराने सन्मानीत करण्यात आहे,
म्हणून विद्यार्थी मित्रांनो जीवनात शिक्षणासोबत मैदानी खेळ आत्मसात असेल तर खेळ कौशल्य,आरोग्य व शरीर संवर्धनशीलता,संयमीपणा,प्रामाणिकपणा,प्रेमळपणा,जिव्हाळाप्रिय,शिस्तबद्धपणा,कर्तव्यनिष्ठपणा,सामंजस्यपणा,दूरदृष्टी व कठोर परिश्रम,जिद्द,चिकाटी,बहुभाषिक,आत्मविश्वास,राष्ट्रीय एकात्मता भाव इ.गुणवर्णन निर्धाराच्या बळावर खेळात नैपुण्य मिळवता येईल उदाहरणार्थ- हाॅकी खेलरत्न ध्यानचंद सिंग व कुस्तीगीर खाशाबा जाधव इ.विषयी महत्त्व पटवून दिलेत व विद्यालयातील माजी खेळाडू- तालुका,जिल्हा,विभाग व राज्यस्तरीय पर्यंत सहभाग नोंदवत खेळाडूचे शब्द सुमनांनी अभिनंदन करण्यात आले व
चालु शैक्षणिक वर्षांत दिनांक - २१/०८/२०२५ वार गुरूवार रोजी धुळे जिल्हा/मनपास्तर शालेय जलतरण क्रीडा स्पर्धा स्थळ स्नेहलनगर धुळे येथे शालेय जलतरण स्पर्धेत वयोगट १७ वर्षाखालील मुलांमध्ये खेळाडू सुधारक मधुकर भील [इयत्ता ९वी] याने २००मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेत धुळे जिल्हास्तरीय उपविजेता झाल्याबद्दल खेळाडूंचे धुळे जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी आदरणीय, अण्णासाहेब श्री.एम के पाटील साहेब, क्रीडा अधिकारी- रेखाजी मॅडम, स्वप्निल बोर्डे, योगेश पाटील,मदन गावीत,अग्रवाल मॅडम, श्वेता गवळी मॅडम,योगेश्वरी मॅडम, कार्यालयीन सहकारी वृंद या सर्वांनी कौतुकास्पद पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले होते
तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासाहेब श्री जे.बी.पाटील व विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.एस.ए.कदम सर व शिक्षक -शिक्षकेत्तर बंधू -भगिनी व पालक वर्ग या सर्वांकडून कु.सुधाकर मधुकर भील यांची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कौतुकास्पद अभिनंदन!🌹🌹💐💐💐व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.व जलतरण स्पर्धेत सहभागी कु.योगे कैलास भील यांचेही अभिनंदन करण्यात आले होते.
तसेच पुढील स्पर्धा- तालुका स्तरावर वैयक्तिक खेळ - बुद्धीबळ,गोळा फेक, उंच उडी, सांघिक खेळ- कबड्डी,खो-खो,नेटबॉल,व विभागीय जलतरण क्रीडा स्पर्धा इ.खेळात सहभाग घेतलेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमास मुख्याध्यापक,
शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-श्री.सी.जी वारूडे सर यांनी केले तर आभार-श्री.एम.एस पाटील सर यांनी मानले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर वृंद यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् राष्ट्रीय गीताने करण्यात आले.
0 Comments