सुजाण नागरिक सा.प्रतिनिधी श्री सी जी वारूडे
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी सुधारक मधुकर भील इ.९वी धुळे जिल्हा शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेत उपविजेता!
सविस्तर वृत्त असे की माता तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्था संचलित अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयातील जलतरण खेळाडू - सुधारक मधुकर भील (इयत्ता ९वी) ह्याने म.न.पा तलाव स्नेहलनगर येथे धुळे जिल्हा शालेय जलतरण क्रीडा स्पर्धा संपन्न.वयोगट १७ मुले त्यात २००मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाने विजयी (उपविजेता) होऊन नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे कौतुकास्पद अभिनंदन करतांना धुळे जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी आदरणीय अण्णासाहेब श्री.एम.के.पाटील साहेब , क्रीडा अधिकारी-आदरणीय ताईसो. सौ.आर.एम.पाटील मॅडमजी, स्वप्निल बोर्डे साहेब,मुद्रा अग्रवाल मॅडम,श्वेता गवळी मॅडम,योगेश्वरी मिस्तरी मॅडम, योगेश पाटील,मदन गावीत, ज्ञानेश्वर वारूडे व कार्यालयीन मंडळी धुळे व शिंदखेडा तालुका शारीरिक शिक्षक समन्वय समिती अधिकारी पदाधिकारी व सेवानिवृत्त आजी-माजी क्रीडा मार्गदर्शक शिक्षक व क्रीडाप्रेमी या सर्व मान्यवर पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
तसेच माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित, अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी ता.शिंदखेडा जि.धुळे या विद्यालयातील संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासाहेब श्री.जे.बी.पाटील व प्रेरणास्रोत मार्गदर्शक मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब श्री.एस.ए.कदम सरजी व सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक -श्री.जे.डी.चव्हाण सरजी यांनी ही शब्द सुमनांनी अभिनंदन केले व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी आणि पालक वर्ग, व क्रीडा शिक्षक श्री.सी.जी.वारूडे सर या सर्वांनी जलतरणपटू कु.सुधाकर मधुकर भील इ.९वी [उपविजेता] व सहभागी विद्यार्थी योगेश कैलास भील (इ.९वी) दोघांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुकास्पद अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
🏊🏊🏊🏊🏊🏊🏊🏊
🌳🦚🌹💐💐🌹🦚🌳
0 Comments