Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच ७९वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सुजाण नागरिक प्रतिनिधी श्री सी जी वारूडे 
    ‌शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच ७९वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
       यावेळी कार्यक्रमांसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासाहेब श्री जे.बी.पाटील, पोलिस पाटील तात्यासो. भाऊराव पाटील, मा.धुळे जिल्हा आरोग्य व शिक्षण सभापती प्रतिनिधी आबासो.श्री.शिवाजीराव पुंडलिक कदम, संस्थेचे संचालक बापूसो.रमेश पुंडलिक कदम,संचालक मंडळ,व आरोग्य कर्मचारी मा.नानासो.गोकुळ जाधव व विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. सुरूवातीला ध्वजस्तंभाचे  मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.नंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासाहेब श्री जे.बी.पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
    यावेळी कार्यक्रम प्रसंगी पसायदान गायन व देशभक्तीगीत संगीतावर कवायत घेण्यात आली नंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत,भाषणं व्यक्त केलीत,नंतर गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षिसे देणाऱ्या दात्यांकडून ट्राॅफी, बक्षिसे व पुस्तके देऊन गुणगौरव करण्यात आले.
      तद्नंतर आदरणीय मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम सर यांनी  स्वांतत्र्य दिना विषयी चे महत्त्व, अब्दुल कलाम यांच्या जीवनशैलीबाबत व बक्षीस देणाऱ्यादात्यांकडून विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्राॅफी, बक्षिसे व पुस्तके देण्यात आले तसेच दरवर्षीप्रमाणे योग दिनाचे औचित्य साधून कलमाडी येथील सेवानिवृत्त आदरणीय भाऊसाहेब गोकुळ धोंडू झालसे(मुंबई )यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत असते व शासनाकडून मिळणारा लाभांश इत्यादी विषयीचे महत्त्व पटवून दिलेत,जिंदाल कंपनी (वाघोदे )कडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ पाकीट वाटप करण्यात आले व चाॅकलेट पाकीट इ.देणाऱ्यांचे दात्यांचे आभार मानले
     यावेळी कार्यक्रमास विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ व  मान्यवरमंडळी व मुख्याध्यापक, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी भदाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन- श्री.पी.आर.पाटील यांनी मानले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय वंदेमातरम गीताने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments