शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व गायत्री माता प्री प्रायमरी सीबीएससी स्कूल मध्ये सातव्या दिवसाची गणरायांची आरती शिंदखेडा नगरपंचायत चे मुख्य अधिकारी श्री श्रीकांत फागणेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. याप्रसंगी
संस्था अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील तसेच नगरपंचायत चे पाणीपुरवठा अधिकारी श्री महेंद्र सैंदाणे, पर्यवेक्षक श्री बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक श्री एस के जाधव श्री एस ए पाटील श्री डी एच सोनवणे श्री ए.टी.पाटील श्री जे डी बोरसे, गणेश उत्सव समिती प्रमुख श्री एम डब्ल्यू तमखाने ज्येष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी संस्था अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील यांच्या मार्गदर्शनाने शाळेत अध्यापन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल शिक्षण पद्धती व डिजिटल लॅब ची पाहणी करून शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 Comments