Header Ads Widget

*तालुकास्तरीय राष्ट्रीय नाट्योत्सव स्पर्धा दोंडाईचा येथे संपन्न*

 पंचायत समिती शिंदखेडा, शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघ,शिंदखेडा तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2025 चे आयोजन रॉयल प्रताप इंग्लिश स्कूल दोंडाईचा येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ चंद्रकला सिसोदिया,अध्यक्ष रॉयल प्रताप स्कूल दोंडाईचा या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून श्री रवींद्र आत्माराम चित्ते सर,अध्यक्ष शिंदखेडा तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ,श्री एस एन पाटील उपाध्यक्ष जिल्हा विज्ञान संघ हे होते. या राष्ट्रीय नाट्योत्सव स्पर्धेत तालुक्यातील शाळांनी सहभाग नोंदवला होता . या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री एम बी बाविस्कर सर,श्रीमती पी.व्ही. पाटील,श्री ए ए महाजन यांनी काम पाहिले. यात प्रथम क्रमांक मीराबाई कन्या विद्यालय शिंदखेडा यांचा आला द्वितीय क्रमांक आर एम आर गर्ल्स हायस्कूल दोंडाईचा व उत्तेजनार्थ कपिलेश्वर माध्यमिक विद्यालय मुडावद यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष श्री रवींद्र चित्ते यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी शिंदखेडा तालुका विज्ञान मंडळ यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमासंबंधी माहिती दिली तसेच राष्ट्रीय विज्ञान नाट्य स्पर्धा कशा प्रकारे घेतली जाते याचे महत्त्व काय हे विशद केले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गीते सर यांनी तर आभार प्रदर्शन एस एन पाटील सरांनी केले. रॉयल प्रताप इंग्लिश स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments