सुजाण नागरिक सा.प्रतिनिधी श्री सी जी वारूडे
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच 'माझी शाळा,माझा स्वाभिमान' उपक्रम प्रतिज्ञा वाचन कार्यक्रम संपन्न.
सविस्तर वृत्त असे की, माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी प्रथमतः विद्यार्थ्यांना "माझी शाळा, माझा स्वाभिमान' या प्रतिज्ञेचे वाचन श्री.पी.आर.पाटील यांनी केले.
तद्नंतर विद्यालयातील आदरणीय प्रेरणास्रोत
मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने "माझी शाळा,माझा स्वाभिमान"हा उपक्रम शाळांच्या विकासासाठी राबविला जातो म्हणून "शाळा एक कुटुंब आहे" ज्यामध्ये शाळा आणि विद्यार्थी यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन दिले जाते म्हणून १सप्टेंबर रोजी "आपलं विद्यालय,आपला स्वाभिमान"या उपक्रमाअंतर्गत याला एक व्यापक स्वरूप देऊन शाळांबद्दल प्रेमा आणि अभिमान व्यक्त करण्याची हाक देण्यात आली त्यात सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक,धार्मिक व शालेय उपक्रम -राष्ट्रीय सण उत्सव साजरा करणे व परिपाठ,जयंती-पुण्यतिथी, विद्यार्थी -पालक-शिक्षक संघ व आजी-आजोबा मेळावा,वृक्षारोपण, स्वच्छता उपक्रम, स्पर्धा परीक्षा, वकृत्व स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन,चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा व लेखन, वाचन,भाषणं, संभाषण व अक्षर अवयव रेषा आकार सराव इ.उपक्रम शाळेच्या प्रगतीसाठी व स्वच्छतेसाठी तसेच एक चांगला आदर युक्त नागरिक बनण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार प्रतिज्ञा केवळ एका दिवसासाठी नसून ती दररोज आचरणात आणायची आहे व शाळेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायचे आहेत इ.विषयीचे मत व्यक्त केले
यावेळी कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग, मा.मुख्याध्यापक,शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
0 Comments