Header Ads Widget

*रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स व उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान शिबिर*

 दोंडाईचा ( दि १/९/२०२५) दोंडाईचा शहरातील अष्टविनायक गणेश मित्र मंडळ व कोठारी पार्कचा राजा गणेश मित्र मंडळ कोठारी पार्क दोंडाईचा येथे गणेशोत्सव निमित्ताने भव्य सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले  शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन यांनी केले याप्रसंगी प्रमुख पाहुणेपदी प्रभागाच्या नगरसेविका तथा माजी पाणीपुरवठा सभापती सौ वैशाली महाजन डॉ सौ प्रतिमा धनगर सौ इंदिरा रावल इ मान्यवर उपस्थित होते.
      शिबिरात एकुण १४५ रुग्णांची तपासणी उपजिल्हा रुग्णालयाचे *वैद्यकीय अधीक्षक डॉ बी एस कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ञ डॉ अवनी पाटील मंडाले* यांनी केली औषधनिर्माण तंत्रज्ञ सौ कल्याणी सिसोदीया  आरोग्यसेवक पंकज राजपूत भुषण माळी इ कर्मचारी उपस्थित होते.रुग्णांना मोफत तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले शिबिरातील २७ संशयित रुग्णांना रक्ताच्या तपासण्या, हृदयरोग, रक्तदाब ,दंत चिकित्सा दुर्धर खोकला इ तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवीण्यात आले 
शिबिराचे आयोजन रोटरी सिनियर्सचे अँन्स ग्रुप तर्फे प्रथम महिला सौ वैशाली महाजन सौ प्रतिमा धनगर व सौ इंदिरा रावल यांनी केले शिबिर यशस्वीतेसाठी अष्टविनायक मित्र मंडळाचे विशाल राजपुत महेंद्र गिरासे मयुर राजपुत गोकुळ सिंग राजपुत संजय राजपुत किशोर सोनार सौ रंजना पवार सौ शितल पाटील रंजना राजपुत सौ संगीता राजपुत सौ पिंगला राजपुत व कोठारी पार्कचा राजा मित्र मंडळाचे सागर पवार विक्की कोळी इ पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा*.

Post a Comment

0 Comments