Header Ads Widget

*संस्था खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे यांच्या शुभहस्ते जनता हायस्कूल मध्ये श्रीं ची आरती.*

    शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व गायत्री माता प्री प्रायमरी सीबीएससी स्कूल मध्ये पाचव्या दिवसाची श्री गणेशांची आरती जनता विद्या प्रसारक संस्थेचे खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे व माजी मुख्याध्यापिका श्रीमती मंगला देवेंद्र बोरसे यांच्या शुभहस्ते सहपत्नीक करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य श्री एस एस पाटील पर्यवेक्षक श्री बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक श्री एस के जाधव श्री एस ए पाटील श्री डी एच सोनवणे श्री जे डी बोरसे गणेश उत्सव समिती प्रमुख श्री एम डब्ल्यू तमखाने उपप्रमुख श्री आर यु पाकळे ज्येष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
   याप्रसंगी विद्यादेवता श्री गणराया यांच्या कृपेने शाळेच्या गुणवत्तेत तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा अशी भावना याप्रसंगी व्यक्त केली.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments